Thane Theft : चोरीला गेलेला 1 कोटी 20 लाख रुपयाचा मुद्देमाल नागरिकांकडे सुपूर्द, नौपाडा पोलिसांची कारवाई

हस्तगत केलेल्या मुद्देमालाची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. कोर्टाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. याबद्दल सर्व नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले.

Thane Theft : चोरीला गेलेला 1 कोटी 20 लाख रुपयाचा मुद्देमाल नागरिकांकडे सुपूर्द, नौपाडा पोलिसांची कारवाई
चोरीला गेलेला 1 कोटी 20 लाख रुपयाचा मुद्देमाल नागरिकांकडे सुपूर्दImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 6:38 PM

ठाणे : नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडून त्यांच्या जवळून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त (Seized) केला आहे. सर्व मुद्देमाल फिर्यादींना परत (Return) केला. नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी वरील मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत केला. हस्तगत केलेल्या मुद्देमालाची किंमत 1 कोटी 20 लाख रुपये आहे. पोलिसांनी आरोपींना अटक (Arrest) केली आहे. कोर्टाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून नागरिकांना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला. याबद्दल सर्व नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले.

चोरीचा माल हस्तगत करत आरोपींना गजाआड केले

तक्रारदार डॉ. अनुजा कुलकर्णी यांचा सॅमसंग गँलॅक्सी कंपनीचा मोबाईल त्यांच्या क्लिनिकमधून चोरून आरोपीने तामिळनाडू येथे विकला होता. तो पोलिसांनी मोठ्या हुशारीने हस्तगत केला. चरई येथील रविंद्र कारेकर यांच्या घरातील 15 ग्रॅमची सोन्याची चैन, दोन फोन, दोन घड्याळ असा चोरून नेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला. त्यानंतर मुंब्रा येथील आलम खान यांची ऑडी गाडी त्यांनी मोठ्या विश्वासाने ललित शर्मा या मित्राला दिली होती. त्याने ती गाडी शशी शर्मा याला 12 लाखाला परस्पर विकली. ती गाडी पोलिसांनी तांत्रिक तपास करून नागपूर येथून जप्त करत फिर्यादिला परत केली. सिद्धेश्वर तलाव येथील आरती वाळंज या कुटुंबासाह गावी गेल्या असता त्यांच्या घरातून सोने व रोख रक्कम 81 हजार रुपये चोरीला गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला.

नौपाडा येथील दीपिका गंगूत्रे यांच्या गळ्यातील चैन ओढून पळून गेलेल्या आरोपींना पकडून त्यांच्याकडून 45 हजार रुपयाची चैन हस्तगत करून त्यांना आज परत देण्यात आली. रोहित कदम यांची चोरीला गेलेली अॅक्टिव्हा गाडी एका अल्पवयीन आरोपीला पकडून त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आली. सुनिल नलावडे यांचा नितीन कंपनी येथून चोरून नेलेला मोबाईल, पोलिसांनी हस्तगत केला आणि त्यांना परत करण्यात आला. महेश दळवी यांची चोरून नेलेली हिरो होंडा मोटारसायकल बेवारस मिळून आली ती त्यांना परत करण्यात आली. डॅनियल अल्मेडा यांची चोरून नेलेली टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल रस्त्यावर बेवारस मिळून आली ती आज परत करण्यात आली. राजकुमार यादव यांची चोरून नेलेली रिक्षा बेवारसपणे रस्त्याच्या कडेला आढळून आली, ती आज त्यांना परत करण्यात आली. चंद्रकांत कातकडे यांची चोरून नेलेली यमाहा कंपनीची फसिनो मोटार सायकल तलावपाळी येथे बेवारस मिळून आली ती त्यांना परत करण्यात आली. (Property worth Rs 1 crore 20 lakh stolen in Thane handed over to citizens)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.