Mumbai : गोवंडीत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह, परिसरात उडाली खळबळ

आगोदर देखील बैंगनवाडी परिसरात अशी अनेक प्रकरण घडली आहेत. सध्याचं प्रकरण नेमकं कशामुळं घडलं असावा याचा पोलिस शोध घेत आहेत.

Mumbai : गोवंडीत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह, परिसरात उडाली खळबळ
लातूरमध्ये सासूची हत्या करुन जावयाची आत्महत्या
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 29, 2022 | 1:24 PM

मुंबई : शिवाजी नगर (Shivaji Nagar) येथील बैगनवाडी (Baiganwadi) परिसरात एका घरात दोन मुलांसह एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना नुकतीच घडली असून पोलिस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. गोवंडी परिसरात येत असलेल्या बैगनवाडी परिसरात अशा घटना अनेकदा उघडकीस आल्या आल्या आहे. सदर झालेल्या घटनेमध्ये दोन मुलांचा समावेश आहे. तसेच इतर दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. घटना घडल्यापासून परिसरात खळबळ उडाली आहे. सदर परिसरात बघ्यांची गर्दी होत असल्यामुळे पोलिसांनी तिथं अधिक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. चारही मृतदेश शवविच्छेदनासाठी चेंबूरच्या (Chembur) शताब्धी रुग्णालयात दाखल कऱण्यात येणार आहेत.

अद्याप मृतदेहाची नावे पोलिसांनी जाहीर केलेली

अद्याप मृतदेहाची नावे पोलिसांनी जाहीर केलेली नाहीत. त्याचबरोबर या मागे नेमकं काय कारण असावं याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळावरून त्यांना जे हवे आहेत ते पुरावे घेण्याचं काम सुरु आहे. शेजारी असलेल्या कुटुंबाकडून माहिती घेण्याचं काम पोलिस घेत आहेत. संशयास्पद वस्तू पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. चारही मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल अशी पोलिसांची भूमिका आहे. बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची गर्दी अधिक वाढली आहे.

आगोदर देखील बैंगनवाडी परिसरात अशी अनेक प्रकरण घडली आहेत

याच्या आगोदर देखील बैंगनवाडी परिसरात अशी अनेक प्रकरण घडली आहेत. सध्याचं प्रकरण नेमकं कशामुळं घडलं असावा याचा पोलिस शोध घेत आहेत. वारंवार गोवंडी परिसरात क्षुल्लक कारणावरून हत्या झाल्या आहेत. परंतु एकाच कुटुंबातील चारजण असल्याने नेमकं काय कारण असावं याचा पोलिस शोध घेत आहेत.