शादाब बटाटाने तोंड उघडलं, NCB ने बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन उचललं

अभिनेता एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे (Ajaz Khan arrested by NCB)

शादाब बटाटाने तोंड उघडलं, NCB ने बॉलिवूड अभिनेत्याला मुंबई विमानतळावरुन उचललं
बॉलिवूड अभिनेता एजाझ खानला एनसीबीची अटक

मुंबई : बिग बॉस फेम बॉलिवूड अभिनेता एजाझ खानला (Ajaz Khan) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतलं. राजस्थानहून मुंबईत पोहोचताच एअरपोर्टवर एजाझला ताब्यात घेतलं. ड्रग्ज माफिया शादाब बटाटा (Shadab Batata) याच्या चौकशीतून एजाझचं नाव उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एनसीबीच्या मुंबई कार्यालयात नेऊन एजाझ खानची चौकशी केली जाणार आहे. (Bollywood Actor Ajaz Khan arrested by NCB after Shadab Batata named in drug case)

कोण आहे एजाझ खान?

एजाझ खानने रक्तचरित्र, अल्लाह के बंदे यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये काम केलं आहे
रहे तेरा आशीर्वाद, कहानी हमारे महाभारत की, करम अपना अपना यासारख्या मालिकांमध्येही अभिनय
बिग बॉसच्या सातव्या सिझनमुळे वादाच्या भोवऱ्यात
फिअर फॅक्टर- खतरों के खिलाडी, कॉमेडी नाईट्स विथ कपिलमध्येही सहभाग
एक्टसी टॅबलेट्सच्या माध्यमातून ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्येही अटक
जुलै 2019 मध्ये धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्या प्रकरणी गुन्हा

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan)

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रग्ज माफियाच्या मुलाला अटक केली. मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटासह अन्य एकाला बेड्या ठोकण्यात आल्या. दोन कोटींपेक्षा जास्त किंमतीचे एमडी ड्रग्ज, एक फॉर्च्युनर, एक i20, आणि एक बलोनो अशा 3 कार जप्त केल्या आहेत. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली. (Bollywood Actor Ajaz Khan arrested by NCB after Shadab Batata named in drug case)

एनसीबीने अटक केलेला शादाब हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया फारुख बटाटा याचा मुलगा आहे. मुंबईतील मोठे पब त्याचप्रमाणे बॉलीवूड इंडस्ट्रीमधील लोकांना शादाब ड्रग्स सप्लाय करायचा असा एनसीबीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे.

शादाब बटाटा आणि शाहरुख खान एलियास उर्फ शाहरुख बुलेट (कोड नेम- बुलेट राजा) असे अटक केलेल्या ड्रग्स माफियांची नाव आहेत. शादाब बटाटा हा फारुख बटाटा यांचा मुलगा असून फारुख बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स माफिया आहे. एनसीबीने शादाबला मिरारोड येथून तर शाहरुखला वर्सोवा येथून ताब्यात घेतले. त्यावेळी शादाबच्या घरी 1.60 ग्रॅम MD, 61 मेफेड्रोनही जप्त करण्यात आले.

झोपडपट्टीत राहणाऱ्या शाहरुखची अलिशान लाईफस्टाईल

शाहरुख खान एलियास उर्फ शाहरुख बुलेट याला एनसीबीने अंधेरीच्या कासम नगरमधून ताब्यात घेतले. यावेळी ड्रग्ज तस्करीतून सुरु असलेली अलिशान लाईफस्टाईल समोर आली. या कारवाईत एनसीबीने अनेक गाड्या, विदेशी चलन, ड्रग्ज आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त केले.

कोण आहे फारुख बटाटा?

शादाब बटाटा हा फारूक शेख उर्फ फारुख बटाटा याचा मुलगा आहे. फारुख बटाटा हा जेव्हा सुरुवातीला मुंबईत आला तेव्हा तो बटाटा विकायचा. यामुळे त्याचं नाव फारुख बटाटा अस झालं. बटाटे विकता विकता फारुख मुंबईत ड्रग्स विकणाऱ्या गँगस्टर यांच्या संपर्कात आला. आणि मग तो ही ड्रग्स विकू लागला.  गेल्या काही वर्षात तो ड्रग्जचा मोठा व्यापारी झाला.

मुंबईत देशभरातून त्याचप्रमाणे परदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी होत असते. हे ड्रग्स फारूक बटाटा याच्याकडे उतरत असत. त्यानंतर ते ड्रग्स फारुख गँगची लोकं इतरत्र वितरित करत असतात. प्रामुख्याने बड्स , गांजा ,एल एस डी , एम डी या ड्रग्जच्या पुरवठ्यासाठी फारुख ओळखला जातो.

संबंधित बातम्या :

बटाटा विक्रेता ते मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया; कोण आहे फारुख बटाटा?

(Bollywood Actor Ajaz Khan arrested by NCB after Shadab Batata named in drug case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI