गाझियाबाद : मुलाने कॅरम तोडला म्हणून संतापलेल्या महिलेने मुलाला बेदम मारहाण केल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली. महिलेच्या मारहाणीत मुलाचे लिव्हर फाटल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुलाच्या पित्याने त्याच्या आईसह तिच्या मैत्रिणीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. ज्योती असे मारहाण करणाऱ्या आरोपी महिलेचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी चिमुकल्याच्या मोठ्या बहिणीचे कँसरने निधन झाले होते. मुलाचे आई-वडिल वेगवेगळे राहत असून, त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया कोर्टात सुरु आहे.