Extramarital Affair : दोघे लॉजवर गेले, तिथे प्रियकराने विवाहितेसोबत अशी कृती केली, की तिचा जीवच गेला

Extramarital Affair : रक्षिताच सुभाषसोबत लग्न झालं होतं. पण रक्षिताचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते. तिचं सिद्धाराजूसोबत अफेअर सुरु होतं. तिला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घरात ठेऊन बाहेर पडली. घरातल्यांना तिने खोट सांगितलं. रेस्टॉरंटच्या लॉजमध्ये रुम बुक केली होती. दोघे लॉजच्या रुमवर गेले.

Extramarital Affair : दोघे लॉजवर गेले, तिथे प्रियकराने विवाहितेसोबत अशी कृती केली, की तिचा जीवच गेला
extramarital affair case
| Updated on: Aug 26, 2025 | 12:34 PM

सध्या विवाहबाह्य संबंधातून गुन्ह्यांच प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक विचित्र पण धक्कादायक घटना समोर आली आहे. युवती मोठ्या विश्वासाने तिच्या प्रियकराला भेटायला गेली. युवती विवाहित होती. मैसूरच्या हुंसूर येथील गेरासनहल्ली येथे राहणाऱ्या रक्षिताच केरळच्या सुभाषसोबत लग्न झालं होतं. तिला एक दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याचवेळी रक्षिताचे बाहेर विवाहबाह्य संबंध होते. तिचं पेरियापटना तालुक्यातील बेट्टाडापुरा येथे राहणाऱ्या सिद्धाराजूसोबत अफेअर सुरु होतं. लग्नानंतरही त्यांचं भेटणं सुरु होतं. सिद्धाराजूनसोबत तिचं बोलणं व्हायचं. सिद्धाराजू रक्षिताचा जवळचा नातेवाईक लागतो. रक्षिता आणि सिद्धाराजू दोघांना लग्न करायचं होतं. पण रक्षिताच्या कुटुंबियांनी तिचं केरळच्या युवकासोबत लग्न लावून दिलं.

कर्नाटकच्या मैसूरमधील हे प्रकरण आहे. सिद्धाराजूने रक्षिताची हत्या केली, त्यावेळी ती आपल्या माहेरी आलेली. शुक्रवारी ती आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घरात ठेऊन बाहेर पडली. घरातल्यांना तिने खोट सांगितलं की, केरळमध्ये राहणाऱ्या तिच्या सासूची तब्येत चांगली नाहीय. कुटुंबियाशी खोटं बोलून ती प्रियकर सिद्धाराजू सोबत के.आर. नगरच्या कप्पाडी क्षेत्रातील मंदिरात गेली. त्यानंतर दोघे सालिगराम भेर्या गावातील एसजीआर बार एंड रेस्टॉरंटमध्ये थांबले.

दोघे लॉजच्या रुमवर गेले

इथे सिद्धाराजूने आधीपासूनच रक्षिताला मारण्याच प्लानिंग केलेलं. त्यांनी रेस्टॉरंटच्या लॉजमध्ये रुम बुक केली होती. दोघे लॉजच्या रुमवर गेले. तिथे सिद्धाराजूने निदर्यतेने रक्षिताची हत्या केली. सिद्धाराजूने तिच्या तोंडात जिलेटिनची कांडी टाकून स्फोट घडवला. तोंडात स्फोट झाल्यामुळे ती गंभीररित्या जखमी झालेली. तिचा मृत्यू झाला.

सर्व कटाचा पर्दाफाश

त्यानंतर सिद्धाराजूने तिचा मोबाइल बॅटरीच्या स्फोटात मृत्यू झाल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं. पोलिसांनी बॉयफ्रेंडला अटक केली आहे. लॉजच्या कर्मचाऱ्यांनी रक्षिताला त्या अवस्थेत पाहिल्यानंतर सिद्धाराजून मोबाइल स्फोटाची कहाणी रचली. घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानतंर सर्व कटाचा पर्दाफाश झाला.

तेव्हाच खरं कारण समजेल

रक्षितच्या कुटुंबियांनी सांगितलं की, त्यांना रक्षिताच्या बाहेर सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाची माहिती नव्हती. पोलिसांनी सिद्धाराजूला अटक केलीय. त्याची चौकशी सुरु आहे. चौकशीतूनच रक्षिताच्या हत्येच खरं कारण समोर येईल.