
सुखी संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी योग्य जोडीदार मिळणं आवश्यक आहे. अन्यथा खटके उडतात आणि आयुष्याची राखरांगोळी होते. मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पाच वर्षांचा मुलगा असलेल्या आईला अविवाहीत सांगून ब्राह्मण समाजातील तरूणाशी लग्न लावून दिलं. वधू जेव्हा घरी आली आणि मधुचंद्राच्या रात्री तिच्या तोंडून या अल्लाह आणि अल्लाह कसम यासारखे शब्द बाहेर पडले आणि वराच्या पायाखालची वाळूच सरकली. नवरदेवाला लग्न करून घरी आणलेली बाई मुस्लिम असल्याचं कळलं. इतकंच काय तर वधू घरातून अडीच ते तीन लाख घेऊन फरार झाली आहे. आता पीडित तरुण न्यायासाठी पोलिसांचे उंबरठे घासत आहे. पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी परशुराम सेनेसोबत कमिश्नर कार्यालयात तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगर भागातील हिंगोनिया खुर्द गावातील हे प्रकरण आहे. या गावात राहणाऱ्या जसवंत कुशवाह याचं लग्न काही केल्या होत नव्हतं. त्याच्यासाठी कुटुंबिय स्थळं शोधत होते. या दरम्यान, जसवंतच्या भावाने मुकेश मराठा नावाच्या व्यक्तीची ओळख करून दिली. मुकेशने स्थळ शोधण्यासाठी 20 हजार रुपये मागितले आणि तुझ्या भावाला मुलगी शोधतो असं सांगितलं. यानंतर कुटुंबियांनी त्याला पैसे दिले आणि मुकेशने वधुसोबत ओळख करून दिली. 26 फेब्रुवारी 2024 रोजी दोघांचं लग्न ठरलं. यासाठी जसवंत कुटुंबिय तयारी करत होते. पण रात्री इंदोरवरून परताना वधुचा अपघात झाल्याचं सांगून लग्न रद्द केलं. त्यानंतर मुकेशने कोमल आणि नेहासोबत त्यांची ओळख करून दिली.
कोमलने अडीच लाख घेतले आणि निकिता नावाच्या मुलीला ब्राह्मण समाजातील आणि अविवाहित असल्याचं सांगून जसवंत आणि त्याच्या कुटुंबियांशी भेट घालून दिली. त्यानंतर 26 फेब्रुवारीला जसवंत आणि निकीता यांचं विवाह झाला. पण लग्नाच्या काही दिवसानंतर निकिताच्या तोंडून या अल्लाह आणि अल्लाह कसम असे शब्द वारंवार कानावर पडू लागले. त्यामुळे कुटुंबियांना संशय आला आणि त्यांनी निकिताची चौकशी केली. तेव्हा तिने तिचं नाव नाजिया असल्याचं सांगितलं.
लग्न जमवण्यात हात असलेली कोमल काही दिवसांनी जसवंतच्या घरी आली. तिने त्याच्या घरच्यांना गोड बोलून अडकवलं आणि नाजियाला सोबत घेऊन गेली. तीन दिवसानंतर नाजिया परत आली. तिने कोमल पठाण तिचं लग्न करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेल्याचं सांगितलं. तेव्हा त्याला नकार देऊन परत आल्याचं सांगितलं. त्याच्या एक दिवसानंतर जसवंतला शाहनवाज उर्फ शानूचा फोन आला. त्याने तो नाजियाचा पती असल्याचं सांगितलं आणि त्यांना पाच वर्षांचा मुलगा असल्याचं सांगितलं. हे ऐकून कुटुंबियांना धक्का बसला.
नाजियाने घरातून सामनाची आवराआवर केली आणि पळ काढला. त्यानंतर नाजियाच्या कुटुंबियांची माहिती जसवंतला मिळाली. ते नायता मुंडला येथे एका भाड्याच्या खोलीत राहात असल्याच कळलं. नाजियााच मुलगा तिच्या आईसोबत राहात आहे. जेव्हा नाजियाच्या आईसोबत बोलं झालं तेव्हा तिने सर्व विसरून जा असं सांगून धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचं कळताच कुटुंबियांनी परशुराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
जसवंतने यापूर्वीच गांधीनगर पोलिसात तक्रार केली होती. मात्र त्यांनी काहीच कारवाई केली नाही असा आरोप आता जसवंतच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे परशुराम सेनेचे पदाधिकाऱ्यांसोबत जसवंत कुशवाह पोलिस आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी गेले होते. या प्रकरणाची दखल घेतली असून आता चौकशी केली जात आहे.