नवरा बाहेर गेला की पत्नी ट्यूशन टीचरसोबत नको ते करायची, मग झालं असं की…
पती पत्नी आणि तो अशी अनेक प्रकरणं आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याची आकडेवारी आहे. असंच एक प्रकरणी बिहारच्या समस्तीपूरमध्ये घडलं. तिथे एका महिलेचं दुसऱ्यासोबत प्रेम प्रकरण सुरु होतं.

देशभरात गुन्हेगारीची आकडेवारी काढली तर त्यातून अनैतिक संबंधातून सर्वाधिक गुन्हे झाल्याचं दिसून येईल. पती पत्नीच्या नात्यात तिसरा व्यक्ती आला की वाद होता आणि त्याचं रुपांतर गुन्ह्यात होतं. पती पत्नीचं नातं हे सात जन्माचं असतं. पण आता बऱ्याच प्रकरणात हे फक्त सांगण्यापूरतं उरलं आहे. लग्नानंतर अनेक प्रकरणात अनैतिक संबंधाचे प्रकरणं उघडकीस येतात. असंच काहीसं बिहारच्या समस्तीपूरमध्ये घडलं. एका महिलेने पती आणि दोन मुलं असताना दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध जुळवले. असं होत असताना पतीने त्या दोघांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर प्रियकरासोबत एकत्र त्या महिलेने पतीचा काटा काढला. इतकंच काय तर मारल्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागणार नाही याची काळजीही घेतली. पण गुन्हेगार किती मोठा आणि हुशार असला तरी काही ना काही पुरावा सोडतो. असंच या प्रकरणात झालं आणि पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आणि तुरुंगात रवानगी केली.
बिहारच्या लगूनियां रघुकंठ भागातील ही घटना आहे. या ठिकाणी 30 वर्षीय सोनू कुमार पत्नी स्मिता आणि दोन मुलांसह राहात होता. सोनू रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषन करायचा. सकाळपासून संध्याकालपर्यंत तो मेहनत करायचा. पण त्याची पत्नीला त्याच्या मेहनत आणि प्रामाणिकपणाचं काहीच कौतुक नव्हतं. कारण तिचे ट्यूशन टीचर हरिओम कुमारसोबत सूत जुळलं होतं. मुलांच्या शिक्षणासाठी तो रोज घरी यायचा. यावेळी त्याचे आणि स्मिता प्रेमसंबंध जुळले. याची सोनूला सूतराम कल्पना नव्हती.
हरिओम आणि स्मिता हे दोघं सोनू बाहेर जायची वाट पाहायचे. तो बाहेर गेला की लगेच यांचं अनैतिक संबंध सुरु व्हायचे. मुलांना बाहेर खेळायला पाठवायचे त्यामुळे त्यांच्यावर कोणाचाही संशय नव्हता. हे प्रकरण बरेच दिवस सुरू होतं. पण एक दिवस पतीने या दोघांना तसं करताना पाहीलं आणि संतापला. त्यानंतर पत्नीसोबत त्याचे खटके उडू लागले. सोनूचे वडील टुनटुन झा यांच्या मते, शुक्रवारी रात्री 12 वाजता सोनू रिक्षा चालवून घेरी आला होता. मग काय झालं माहिती नाही. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह मिळाला.
टुनटुन यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गुन्हा दाखल केला. तसेच सोनूची पत्नीला अटक केली आणि चौकशी केली. त्यात धक्कादायक खुलासा तिने केला आणि गुन्ह्याची कबुली दिली. सोनू आणि स्मिताचं लग्न सहा वर्षांपूर्वी झालं होतं. लग्नानंतर सोनू आणि त्याच्या पत्नीचा वाद झाला होता. हा वाद पंचायतीकडे गेला होता. तेव्हा त्यांना बाँड पेपर तयार केला होता.
