पती पत्नी आणि दीर…! इंस्टाग्रामवरील चॅटिंगमध्ये झाला धक्कादायक खुलासा
अनैतिक संबंधातून गुन्हेगारीचे अनेक प्रकरणं आतापर्यंत घडली आहे. कोणतंही प्रकरण घडलं की पोलिसांची तपासाची सुई आधी तिथेच जाते. पण एका प्रकरणाचा पोलिसांनी इंस्टाग्राम चॅटिंगमधून उलगडा केला. हे गुन्हा वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

नात्याला कालिमा फासणाऱ्या घटनेचा उलगडा झाला आहे. पती, पत्नी आणि दीर असं ते प्रकरण होतं. दिल्लीत घडलेल्या एका खुनाचा खुलासा झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. कारण पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. कारण पती त्यांच्या अनैतिक संबंधात अडसर ठरत होता. पण धक्कादायक बाब म्हणजे तिचा प्रियकर हा दुसरा तिसरा कोणी नसून तीचा दीर होता. हत्येच्या घटनेला नैसर्गिक मृत्यू दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण इंस्टाग्राम चॅटिंग आणि कबुली दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. दिल्लीच्या सुष्मिता आणि तीच्या दीर राहुलने ही हत्या कशी केली आणि त्यांचा प्लान काय होता? जाणून घ्या.
13 जुलैच्या सकाळी दिल्लीच्या एका रुग्णालयातून पोलिसांना फोन आला की एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. करणची पत्नी सुष्मिताने कुटुंबियांना रडत रडत सांगितलं की, त्याला विजेचा झटका लागला आणि तो बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे तो मृत झाल्याचं घोषित करण्यात आलं. पण कुटुंबियांना त्याच्या मृत्यूबाबत संशय आला. कारण सुष्मिता आणि तिच्यासोबत असलेला दीर राहुल पोस्टमार्टम करण्यास मनाई करत होते. त्यामुळे संशयाची पाल चुकचुकली. करणचा सख्खा भाऊ कुणाल या दोघांवर संशय होता. तेव्हा त्याने चुलत भावाच फोन तपासला आणि इंस्टाग्राम चॅटींगमधून सर्व कट उघड झाला. या चॅटमध्ये करणला संपण्याची चर्चा झाली होती.
या प्रकरणानंतर पोलिसांनी सुष्मिताला खाक्या दाखवला आणि तिने या गुन्ह्याची कबुली दिली. तिने सांगितलं की, पहिल्याला करणला दह्यात मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या. पण करण काही बेशुद्ध झाला नाही. मग त्याला पाण्यात मिसळून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर राहुलन विजेची तार आणली आणि करणच्या छातीवर आणि हातावर लावली. विजेचा धक्का लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणानंतर पोलिसांनी सुष्मिता आणि राहुलला अटक केली आहे. पोस्टमार्टमध्ये विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. तसेच त्याचा शरीरात गुंगीचेही पुरावे मिळाले.
