AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalgaoan Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी, घरात पैसे देण्याच्या कारणातून भाऊच भावाच्या जीवावर उठला !

पैशासाठी सख्खा भाऊ पक्का वैरी बनल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. पैशासाठी नात्यांचाही विसर पडत आहे.

Jalgaoan Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी, घरात पैसे देण्याच्या कारणातून भाऊच भावाच्या जीवावर उठला !
पैशाच्या वादातून भावाने भावाला संपवले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Aug 17, 2023 | 10:47 PM
Share

मुक्ताईनगर / 17 ऑगस्ट 2023 : पैशामुळे काय घडेल हे सांगता येत नाही. पैशासाठी रक्ताची नातीही लोकं विसरतात. रक्ताची नातीच जीवावर उठत आहेत. अशीच एक घटना जळगावमधील मुक्ताईनगरमध्ये उघडकीस आली आहे. घरखर्चाचे पैसे देत नव्हता म्हणून सख्या भावानेच भावाची हत्या केल्याची घटना मुक्ताईनगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुका माणिक शिंदे असे मयताचे नाव आहे. तर पंढरी माणिक शिंदे असे आरोपीचे नाव आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

काय घडलं नेमकं?

मयत मुका शिंदे हा आपल्या कुटुंबासोबत मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णड शिवारातील वस्तीत राहतो. मुका शिंदे आणि पंढरी शिंदे यांच्यात पैशाच्या कारणावरुन वाद झाला. या वादाचे नंतर हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी पंढरी याने मुका याच्या डोक्यात दगड घातला. यात मुका गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मतयत मुकाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी पंढरीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुक्ताईनगर पोलीस पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?