AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrapur चंद्रपुरात लाकूड डेपोला महाकाय आगा, आगीत लाखोंचं नुकसान, कित्येक किलोमीटरवरून दिसल्या ज्वाला

आग लागल्यावर अग्निशमन दलालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीचा व्हिडिओ पाहिल्यावर या आगीची दाहकचा तुमच्या लक्षात येईल या आगी लोट एवढे मोठे होते की कित्येक किलोमीटरवरून ही आग दिसून येत होती.

Chandrapur चंद्रपुरात लाकूड डेपोला महाकाय आगा, आगीत लाखोंचं नुकसान, कित्येक किलोमीटरवरून दिसल्या ज्वाला
चंद्रपुरात लाकूड डेपोला महाकाय आगा, आगीत लाखोंचं नुकसान, कित्येक किलोमीटरवरून दिसल्या ज्वालाImage Credit source: tv9
| Updated on: May 22, 2022 | 7:15 PM
Share

चंद्रपूर : आग (Chadrapur Fire) आणि पाण्याच्या नादाला लागू नये असे आपल्यात नेहमीच म्हणातात. कारण दोन्हीही एकदा पसरायला लागले की किती नुकसान करतील याचा अंदाज नसतो. तसाच काहीसा प्रकार चंद्रपुरात घडलाया. चंद्रपुरात एका लाकूड डेपोलो एवढी भीषण आग लागली की अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) नाकीनऊ आले. मात्र ही आग विझवणे शक्य झालं नाही, ही आग बघता बघता एवढी पसरली की नियंत्रण मिळवण्याच्या बाहेर गेली. आणि काही क्षणाता लाकडांनी भरलेला डेपो (Wood Depo) जळून खाक झाला. आग लागल्यावर अग्निशमन दलालाही या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीचा व्हिडिओ पाहिल्यावर या आगीची दाहकचा तुमच्या लक्षात येईल या आगी लोट एवढे मोठे होते की कित्येक किलोमीटरवरून ही आग दिसून येत होती.

भीषण आगीचा व्हिडिओ

चंद्रपुरात नेमका कुठे घडला हा विपरीत प्रकार?

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात लाकूड डेपोला ही भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आष्टी मार्गावरील बल्लारपूर पेपर मिलच्या लाकूड साठवण डेपोत धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारी लागलेल्या आगीत संपूर्ण डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती समोर आली आहे. अगदी महामार्गलगत असलेल्या या लाकूड डेपोच्या आगीच्या ज्वाळा कित्येक किलोमीटर दुरून दिसत आहेत, असे प्रत्यक्षदर्शी सांगत आहे, तसेच या आगीच्या व्हिडिओतूनही तेच दिसून येत आहे. बल्लारपूर पेपर मिलचा लगदा तयार करण्यासाठी लागणारा निलगिरी- सुभाबुळ-बांबू असा कच्चामाल याच ठिकाणी उघड्यावर साठविला जातो, त्या ठिकाणीची हा भयानक प्रकार घडला आहे.

आग आणखी भडकली

चंद्रपुर महानगरपालिका व बल्लारपूर पेपर मिलच्या अग्निशमन बंबांचे आग विझवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र उन्हाळ्याचे दिवस- वाऱ्याचा वेग व पाण्याची कमतरता यामुळे वेगाने पसरली आहे. या आगीचे नक्कीच कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. बल्लारपूर शहरातील ही आग आणखी भडकली आहे, अशी ताजी माहिती समोर आली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून बल्लारपूर-आष्टी मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे, या आगीच्या स्थळाच्या अगदी शेजारी पेट्रोल पंप आहे , आग पेट्रोल पंपापर्यंत पोहचू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठ महसुली व पालिका अधिकाऱ्यांसह पेपर मिलचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.