Bhandara Fire : घडीभरचा राग थेट घराला लावली आग, लाखोंचं नुकसान, आता प्रकरण पोहोचलं पोलिसांत

Bhandara Fire : घडीभरचा राग थेट घराला लावली आग, लाखोंचं नुकसान, आता प्रकरण पोहोचलं पोलिसांत
घडीभरचा राग थेट घराला लावली आग, लाखोंचं नुकसान, आता प्रकरण पोहोचलं पोलिसांत
Image Credit source: tv9

हे प्रकरण आता थेट पोलिसांत पोहोचले आहे. त्यामुळे आग लावणाऱ्याच्या अडचणीत तर मोठी वाढ झालीच आहे. मात्र ज्याच्या घराला आग लावली त्याचेही मोठे नुकसान झाल्याने पुन्हा घरं उभं करण्यात आव्हान आता त्यांच्यापुढे असणार आहे.

दादासाहेब कारंडे

|

May 22, 2022 | 6:10 PM

भंडारा : कधी कधी शुल्लक कारणावरून मोठं महाभारत धडून जातं. तसाच काहीसा प्रकार आता भंडाऱ्यात घडलाय. घडीभरचा राग आता चांगलाच महागात पडणे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भंडाऱ्यातील आग. शुल्लक कारणावरून नातेवाईकाने लावली नातेवाईकाच्या घराला आग (Bhandara Fire) लावल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यात घडला आहे. या प्रकरणाने सर्वांनाच हादरवरून सोडलं आहे. या आगीत 1 लाख 50 हजार रुपयाच्या घराची राख झाल्याने (Bhandare Crime) या परिसरात सध्या खळबळ माजली आहे. आता हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. तर हे प्रकरण आता थेट पोलिसांत पोहोचले आहे. त्यामुळे आग लावणाऱ्याच्या अडचणीत तर मोठी वाढ झालीच आहे. मात्र ज्याच्या घराला आग लावली त्याचेही मोठे नुकसान झाल्याने पुन्हा घरं उभं करण्यात आव्हान आता त्यांच्यापुढे असणार आहे. या धक्कादायक प्रकरणात दिघोरी मोठी पोलिसांत (Bhandara Police) गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नेमका कुठे हा प्रकार घडला?

एका महिला नातलगाने खरेदी केलेल्या घरात तात्पुरत्या निवासी सुविधेत राहत असलेल्या अन्य नातलगांनी अल्पश: वादावरून राहत्या घरात आग लावल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर तालुक्यातील जैतपुर येथे घडली आहे. याप्रकरणी महिला घरमालकाचा तक्रारी वरून दिघोरी/मोठी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 25 वर्षीय कोमल प्रकाश खऊल असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून महानंदा गणपत डोकरे असे फिरयादीचे नाव आहे. सध्या या प्रकरणाने भंडाऱ्याला हादरवून सोडलं आहे.

दीड लाखांचं घर जळालं

तक्रारकर्त्या महिला महानंदा यांनी 1 वर्षापूर्वी घटनेतील आरोपीकडून स्थानिक जैतपूर येथे 1 लाख 50 हजार रुपयाला त्याचे राहते घर विकत घेतले होते. घराची विक्री करून देखील तक्रारकर्त्या महिलेच्या परवानगीने घटनेतील आरोपी युवक स्वतःच्या पत्नीसह तात्पुरत्या निवासी सुविधेने विक्री केलेल्या त्या घरात राहत होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी घर खरेदीकर्त्या तक्रारदार महिला व तात्पुरत्या निवासी सुविधेने राहणाऱ्या युवकात अल्पश: मुद्यावर वाद झाला. या वादाने संतापलेल्या आरोपी युवकाने घराला आग लावली. लागलीच अग्निशमन दलाला पाचारन करून आगिवर नियंत्रण मिळविले खरे मात्र या आगीत आरोपीचे विविध जीवनोपयोगी साहित्यासह एकूण 1 लाख 50 हजार रुपयाचे घर जळून खाक झाले आहे.

या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दिघोरी पोलीस करीत आहेत.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें