AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : हाय का आता…चोरटे बेरोजगारांना पण सोडंना झालेत ! नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक

बेरोजगारी कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यात नोकरीच्या (Jobs) नावाखाली फसवणूक (Fraud) झालेल्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. अनेक ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केली जातीये. अशीच एक घटना घडलीये नागपुरात.

Nagpur Crime : हाय का आता...चोरटे बेरोजगारांना पण सोडंना झालेत ! नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक
नोकरीचं आमिष दाखवून फसवणूकImage Credit source: tv9
| Updated on: May 16, 2022 | 7:53 PM
Share

नागपूर : बेरोजगारी कमी व्हायचं नाव घेत नाही. त्यात नोकरीच्या (Jobs) नावाखाली फसवणूक (Fraud) झालेल्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. अनेक ठिकाणी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केली जातीये. अशीच एक घटना घडलीये नागपुरात. डब्लुसीएल आणि एसबीआय (SBI) मध्ये नोकरीचे आमीष दाखवून कोट्यावधीची फसवणूक करण्यात आलीये. फसवणूक करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात नागपूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवलंय.नागपूर जिल्ह्यातील 12 जणांची फसवणूक करण्यात आलीये. या संदर्भात तीन आरोपींना अटक करण्यात आलीये.

जमीन विक्रीच्या नावाखाली 18.22 कोटींची फसवणूक

दरम्यान काही दिवसांपूर्वी नागपुरात जमीन विक्रीच्या नावाखाली 18.22 कोटींची फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक शाखेनं चार जणांच्या घरांची झाडाझडती घेतली. यात सीएम नारायण डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे यांच्या घरांचा समावेश आहे. चिंचभवन परिसरातील जमीन विक्रीच्या नावाखाली व्यावसायिक अली आणि वासाडे यांची 18.22 कोटींची फसवणूक केली. न्यायालयाच्या आदेशाने सीए डेमले, त्यांचा मुलगा अतुल डेमले, विजय रमाणी, गौरीशंकर सच्चानी आणि कमलेश दाढे विरोधात गुन्हा सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय. याच प्रकरणात नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं धाडसत्र राबवलंय. या धाडीत काही कागदपत्र सापडल्याची माहिती आहे. दरम्यान जमिनीचा व्यवहार करून सीए डेमले आणि रमाणीसह नागपुरातील अनेक लोकांची फसवणूक केलीय असा आरोप तक्रारदार नावेद अली यांनी केलाय.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.