AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : कामावर जायची घाई, सेक्सला नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

पीडित महिला ही सकाळी कामावर जायच्या घाईत होती, तेवढ्यात तिच्या पतीने तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी केली. मात्र तेव्हा महिलेने त्याला नकार दिल्याने तो संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने...

Mumbai Crime : कामावर जायची घाई, सेक्सला नकार दिल्याने पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक घटनेने मुंबई हादरली
क्राईम न्यूज
| Updated on: May 31, 2025 | 1:25 PM
Share

राज्यभरात आणि मुंबईत दिवसेंदिवस एकाहून एक भयानक गुन्हे घडताना उघडकीस येताना दिसत आहेत. मुंबईतील उपनगरांपैकी एक असलेल्या चेंबूरनमध्येही असाच एक हादरवणारा आणि अतिशय भयानक प्रकार घडला आहे. सेक्स करण्यास नकार दिला म्हणून एका इसमाने त्याच्या पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये 38 वर्षांची ही विवाहीत महिला जवळपास 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंबीर आहे. सध्या तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.

चेंबूरच्या वाशी नाका येथील धक्कादायक प्रकार असून या कारणावरून पत्नीला जाळणाऱ्या पतीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेमुळे चेंबूरमध्ये अतिशय खळबळ माजली असून नागरीक दहशतीत आहेत.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही 38 वर्षांची असून चेंबूरच्या वाशीनाका येथे पतीसह राहते. काल म्हणजेच 30 मे रोजी ती सकाळी उठली आणि कामावर जाण्यासाठीतयारी करत होती.मात्र तेवढ्यात तिच्या पतीने तिच्याकड सेक्स करण्याची मागणी केली. मात्र आत्ता शक्य नाही , कामावर जायला उशीर होईल असे सांगत महिले शारीरिक संबंधास नकार दिला. तिचा नकार ऐकून पती संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातील केरोसिनचा डबा उचलला आणि ते केरोसिन बायकोच्या अंगावर ओतलं. काडी लावून तिला पेटवून दिला. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेली महिला आक्रोश करू लागली.

तिचा आवाज ऐकून शेजाऱ्या-पाजाऱ्यांनी लगेच धाव घेतली आणि तिला उपचारांसाठी तत्काळ सायन रुग्णालयात दाखल केलं. या घटनेत महिला 70 टक्क्यांपेक्षा अधिक भाजली असून प्रकृती गंभीर आहे. सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीविरोधात हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे चेंबूरमध्ये परिसरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला