AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगीच बापासाठी काळ ठरली, असं काय घडलं की पोटच्या मुलीनंच टोकाचं पाऊल उचललं?

आईचे निधन झाले होते. वडिलच दोन्ही भूमिका पार पाडत मुलांचा सांभाळ करत होते. मग असं काय घडलं की मुलीने टोकाचा निर्णय घेतला.

मुलगीच बापासाठी काळ ठरली, असं काय घडलं की पोटच्या मुलीनंच टोकाचं पाऊल उचललं?
कौटुंबिक वादातून भावाने भावाला संपवले
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 22, 2023 | 4:46 PM
Share

जांजगीर चांपा : छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच जन्मदात्याची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिलडा नेवरा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. मयताचा मुलगा अल्बर्ट भारती याने पोलिसांना वडिलांच्या हत्येची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्देनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. कल्पना भारती असे आरोपी मुलीचे नाव आहे.

पोलीस चौकशीत मुलीची कबुली

पीडित मुलीच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. यामुळे घरी वडील आणि 9 बहिणी, एक भाऊ असा परिवार होता. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी मयताच्या मुलांकडे याबाबत चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान तिसरी मुलगी कल्पना भारती घाबरली होती. पोलिसांना तिच्यावर संशय आला. महिला पोलिसाने मुलीला ताब्यात घेत चौकशी केली असता मुलीने गुन्ह्याची कबुली दिली.

…म्हणून वडिलांची हत्या केली

वडील घाणेरड्या नजरेने पहायचे आणि स्पर्श करायचे. वडिलांचे हे वागणे मुलीला पसंत नव्हते. यावरुन वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. यातूनच मुलीला संताप अनावर झाला आणि काठीने वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन