AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेकांना बघण्यावरुन दोन कुटुंबात जुंपली, सोसायटीच्या पार्किंगमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

हल्ली क्षुल्लक कारणातून मारामारीच्या घटना घडत आहेत. याममध्ये सुशिक्षित कुटुंबही मागे नाहीत. अशीच घटना कोल्हापुरातील एका सुशिक्षित सोसायटीत उघडकीस आली आहे.

एकमेकांना बघण्यावरुन दोन कुटुंबात जुंपली, सोसायटीच्या पार्किंगमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
क्षुल्लक कारणातून दोन कुटुंबात हाणामारी
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Jul 01, 2023 | 3:00 PM
Share

कोल्हापूर : क्षुल्लक कारणातून एका सोसायटीत दोन कुटुंब एकमेकांना भिडल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या घटनेत पोवार कुटुंबीयांकडून मेहता कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली आहे. राजारामपुरी येथे एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही हाणामारीची घटना घडली. या घटनेत महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात पोवार कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी संजय पोवार त्यांची पत्नी विद्या पोवार आणि मुलगा अर्जुन पोवार यांच्यासह 5 ते 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकमेकांना बघण्यावरुन वाद

राजारामपुरीत सोसायटीच्या पार्किंगमध्ये एकमेकांना बघण्यावरून वाद झाला आणि वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. यावेळी पोवार आणि मेहता कुटुंबीयांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. पोवार कुटुंबीयांकडून मेहता कुटुंबातील आई आणि दोन मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. शेफाली मेहता, केनील मेहता, तनिष मेहता अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. संजय पोवार हा छत्रपती संभाजीराजे यांचा कार्यकर्ता असल्याचा महिलेचा दावा आहे. संजय पोवार हा जिल्हा नियोजन समितीचा सदस्यही आहे. संजय पोवार यांच्याकडून जीवितास धोका असल्याने तत्काळ कारवाई करण्याची मागणी मेहता कुटुंबीयांनी केली आहे.

Follow Us
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
गणेशोत्सवात नागपुरातही डीजे बंदीची मागणी; सार्वजनिक मंडळांची नाराजी
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा थेट...
FDA ची सर्वात मोठी कारवाई! बड्या फूड डिलिव्हरी कंपनीचा परवाना निलंबित
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत
काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीत? नाशिकमध्येच... राहुल गांधींच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण!
Gold And Silver Rate Hike | पंतप्रधान मोदी म्हणाले गरज नसेल तर सोनं खरेदी करू नका, अन् बाजारात मोठी घसरण! सोनं तब्बल ₹4,950 तर चांदी ₹8,000 ने घसरली
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियनच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर
आता 100 टक्के न्याय मिळेल! दिशा सालियन यांच्या वडिलांची CBI तपासानंतर पहिली प्रतिक्रिया समोर
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?