AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडी लावण्याच्या कारणातून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी; तीन गंभीर जखमी

या दोन गटात गेल्या आठवड्यात यात्रेत वाद झाला होता. त्यानंतर आज पुन्हा गाडी लावण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाले. या दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

गाडी लावण्याच्या कारणातून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारी; तीन गंभीर जखमी
गाडी लावण्याच्या कारणातून वाद, दोन गटात तुंबळ हाणामारीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 05, 2022 | 10:01 PM
Share

अहमदनगर : जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी (Fighting) झाल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या हाणामारीत तीन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत. जखमींवर शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 17 जणांविरोधात परस्परविरोधी दोन गुन्हे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 12 आरोपींना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. घटनास्थळी माजी मंत्री राम शिंदे, शिवाजी कर्डीले यांनी भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गाडी लावण्याच्या कारणातून भांडण

या दोन गटात गेल्या आठवड्यात यात्रेत वाद झाला होता. त्यानंतर आज पुन्हा गाडी लावण्याच्या कारणावरून भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर दगडफेकीमध्ये झाले. या दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

गावात तणावपूर्ण वातावरण

याप्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलीस बंदोबस्ताचे आदेश दिले. पोलीस अन्य आरोपींचा कसून शोध घेत आहेत. क्षुल्ल्क कारणावरुन झालेल्या वादाचे हाणामारीत रुपांतर होऊन दगडफेकही झाल्याने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. (Clash between two groups due to parking dispute; Three seriously injured)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.