IPL च्या या दिग्गज क्रिकेटरवर अत्याचाराचा आरोप, कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

घडलेल्या या घटनेनंतर पीडितेनं या प्रकरणाची तक्रार कुडी भगतासनी हाउसिंग बोर्ड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

IPL च्या या दिग्गज क्रिकेटरवर अत्याचाराचा आरोप, कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 02, 2025 | 8:39 PM

आयपीएल क्रिकेटर शिवालिक शर्मा हा भविष्यात भारतीय क्रिकेट टीममध्ये दिसू शकतो, मात्र सध्या त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्या विरोधात एका तरुणीच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमका आरोप?

जोधपूरच्या कुडी भगतासनी परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने शिवालिक शर्मा विरोधात तक्रार दाखल केली आहे. 2023 मध्ये मी गुजरातमधील वडोदऱ्याला फिरण्यासाठी आले होते. तिथे माझी ओळख शिवालिक शर्मासोबत झाली. त्यानंतर आमची हळूहळू मैत्री झाली, फोनवर बोलणं होत होतं, त्यानंतर आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर दोन्ही कुटुंबांची ओळख झाली, बोलणं सुरू झालं. शिवालिक शर्माचे आई-वडील जोधपूरला आले. सर्वांच्या संमतीनं आमचा साखरपुडा झाला. एंगेजमेंटनंतर शिवालिक पुन्हा एकदा जोधपूरला आला, त्याने मला लग्नाचं आमिष दाखवलं आणि शारीरिक संबंध बनवले. त्यानंतर आम्ही राजस्थानमधील अनेक ठिकाणी फिरलो सुध्दा.मात्र त्यानंतर ऑगस्ट 2024 मध्ये त्यांच्या कुटुंबानं मला बडोद्याला बोलावं, आणि तिथे आमची एंगेजमेंट तोडली असा आरोप या तरुणीनं केला आहे.

पोलीस चैकशीला सुरुवात

घडलेल्या या घटनेनंतर पीडितेनं या प्रकरणाची तक्रार कुडी भगतासनी हाउसिंग बोर्ड पोलीस ठाण्यात दाखल केली, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून शर्मा विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. या घटनेबाबत माहिती देताना एसीपी आनंदसिंह राजपुरोहित यांनी सांगितलं की, या तरुणीने लग्नाचं आमिष दाखवून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात तीने कोर्टात आपला जबाब देखील नोंदवला आहे. साक्षिदारांचे जबाब देखील नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.

अडचणीत वाढ होण्याची शक्यता

दरम्यान तरुणीच्या आरोपांनंतर या क्रिकेटरच्या अडचणीत आता मोठा वाढ होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.