काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या पीएवर बलात्काराचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress president Sonia Gandhi) यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा(rape) गुन्हा दाखल केला आहे.  दिल्लीच्या  उत्तम नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. माधवन यांनी लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून अद्याप मानधवन यांच्यावर कोणतीही […]

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या पीएवर बलात्काराचा गुन्हा दाखल
दिल्लीत पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 10:21 PM

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी(Congress president Sonia Gandhi) यांचे स्वीय सचिव पीपी माधवन यांच्या विरोधात एका महिलेने बलात्काराचा(rape) गुन्हा दाखल केला आहे.  दिल्लीच्या  उत्तम नगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. माधवन यांनी लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून अद्याप मानधवन यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. नोकरीच्या शोधात असताना या महिलेची माधवन यांच्याशी ओळख झाली होती.

पतीच्या निधनानंतर झाली ओळख

तक्रारदार महिलेचा पती काँग्रेसच्या कार्यक्रमात होर्डिंग्ज आणि पोस्टर लावण्याचे काम करायचा. तक्रादार महिला पतीसह काँग्रेसच्या कार्यक्रमांनाही जात होती. यादरम्यान महिला अनेकदा पक्ष कार्यालयातही गेली होती यामुळे अनेकांशी तिची ओळख झाली होती.  2020 मध्ये पतीच्या निधनानंतर तिची आर्थिक स्थिती बिकट झाली. मदतीच्या आशेने ती काँग्रेस कार्यालयात गेली तेव्हा तिथं कोणीतरी पीपी माधवन यांचा नंबर दिला.

घरी भेटायसा बोलावून केला बलात्कार

महिलेने माधवन यांच्याशी संपर्क साधला. यानंतर माधवन यांनी या महिलेला सुंदर नगर येथील घरी नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावले. तेथे महिलेची कागदपत्रे घेण्यासोबतच माधवनने तिच्या कुटुंबीयांची चौकशी केली.  माझा घटस्फोट झाल्याचे सांगत माधवन यांनी या महिलेसह लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलद्वारे यांच्यात  बोलणे सुरू झाले.

यानंतर माधवन यांनी एकदा रात्री अचानक भेटायला बोलावले.  माधवनने तिला कारमध्ये बसवले आणि ड्रायव्हरला जाण्यास सांगितले. यानंतर त्याने  गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.  मात्र, याला असता तो रागाच्या भरात निघून गेला असे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे.

घटस्फोट झाल्याचे खोटं सांगीतले

दुसऱ्या दिवशी माधवनने महिलेला फोन करून माफी मागितली. त्यानंतर पूर्वीसारखे बोलू लागले. यानंतर पुन्हा एकदा माधवनने घरी बोलावून  बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. यानंतर माधवनचा घटस्फोट झाला नलसल्याचे या महिलेला समजले. माधवनने लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केल्याची तक्रार या महिलेने केली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.