AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आज 5 लोक मरणार… त्या व्हॉट्सअप स्टेट्सने खळबळ; प्रकरण काय आहे?

अमेठीतील एका हत्याकांडाने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. आरोपी चंदन वर्मा याने एकाच कुटुंबातील चौघांची हत्या केली आहे. अख्खं कुटुंबच त्याने संपवून टाकलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यातच त्याचं व्हॉट्सअप स्टेट्स व्हायरल झाल्याने अधिकच खळबळ उडाली आहे.

आज 5 लोक मरणार... त्या व्हॉट्सअप स्टेट्सने खळबळ; प्रकरण काय आहे?
अमेठीतील एका हत्याकांडाने संपूर्ण देश सुन्न झाला आहे
| Updated on: Oct 04, 2024 | 1:52 PM
Share

अमेठीच्या शिवरतनगंज परिसरात नवराबायको आणि दोन मुलींची गोळी मारून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीस आरोपी चंदन वर्माचा शोध घेत आहे. हा आरोपी फरार आहे. तो अजूनही सापडत नाही. मात्र, त्याच्या व्हॉट्सअप स्टेट्सने एकच खळबळ उडवून दिली आहे. पाच लोक मरणार आहेत. लवकरच मी तुम्हाला दाखवेल, असं चंदनच्या स्टेट्सवर लिहिलेलं होतं. त्यामुळे पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.

हत्याकांड घडवून आणल्यानंतर चंदन स्वत:लाही गोळीने मारून घेणार होता, असं सांगितलं जातं. कदाचित पाच लोकांची हत्या झाल्यानंतर त्याने पाच लोकांच्या हत्येबाबत स्टेट्सवर लिहिलं असावं. 21 दिवसांपूर्वी त्याने हा स्टेट्स ठेवला होता. सध्या पोलीस चंदनचा शोध घेण्यासाठी छापेमारी करत आहे. रायबरेली आणि अमेठीत पोलिसांची संयुक्त टीम त्याचा शोध घेत आहे.

बाईक सोडून घरात घुसला

रायबरेली येथील राहणाऱ्या चंदन वर्मानेच टीचर आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. चंदन एकटाच बुलेटने टीचर सुनील कुमार यांच्या मोहल्ल्यापर्यंत गेला होता. त्यानंतर घटनास्थळापासून 20 मीटरच्या अंतरावर बुलेट उभी करून तो एकटाच टीचरच्या घरी पायी गेला होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी रिकामी मॅगझिन सापडली आहे. चंदनच्या पिस्तुलातीलच ही मॅगझिन असल्याचं दिसून आलं आहे. चंदनला लवकरात लवकर अटक करून या प्रकरणाचा छेडा लावणार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पोस्टमार्टेम रिपोर्ट काय म्हणतो?

चंदन वर्माने चार लोकांची हत्या केली होती. यावेळी त्याने अनेक राऊंड फायरिंग केली होती. या फायरिंग नंतर बुलेटचे खोके सपाडले आहेत. पोस्टमार्टेम रिपोर्टनुसार, टीचरला एक गोळी, त्याच्या बायकोला दोन गोळ्या तर दोन्ही मुलींना प्रत्येकी एक एक गोळी लागली होती.

काय घडले?

सुनील कुमारची दिवंगत पत्नी पूनम भारती यांनी रायबरेलीत चंदन वर्माच्या विरोधात छेडछाड आणि मारहाणीची तक्रार नोंदवली होती. ॲट्रोसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चंदनला पकडून त्याला तुरुंगात डांबण्यात आलं होतं. चंदनने आता सुनील कुमार यांच्या अख्ख्या कुटुंबालाच संपवलं आहे. त्यामुळे पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आलीय का? या अँगलनेही पोलीस या प्रकरणाकडे पाहत आहेत. चंदन हा रायबरेलीच्या तिलिया कोट मोहल्ल्यातील राहणारा आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.