साठवलेले 1500 रुपये वडिलांनी खर्च केल्याचा राग, लोखंडी दांड्याने मारहाण करुन मुलाकडून हत्या

आपण वडिलांकडे दीड हजार रुपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. काही दिवसांनी आपण त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी ते खर्च झाल्याचं सांगितलं, असं मुलाने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं.

साठवलेले 1500 रुपये वडिलांनी खर्च केल्याचा राग, लोखंडी दांड्याने मारहाण करुन मुलाकडून हत्या
प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून
| Edited By: | Updated on: Aug 20, 2021 | 11:46 AM

भोपाळ : सांभाळून ठेवण्यासाठी दिलेले 1500 रुपये खर्च केल्याच्या रागातून मुलाने आपल्या वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाने वडिलांना लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात ही घटना घडली. आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

आपण वडिलांकडे दीड हजार रुपये सांभाळून ठेवण्यासाठी दिले होते. काही दिवसांनी आपण त्यांना विचारलं, तेव्हा त्यांनी ते खर्च झाल्याचं सांगितलं, असं मुलाने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं. पैसे खर्च केल्याने बापलेकात मोठा वाद झाला. रागाच्या भरात मुलाने वडिलांना लोखंडी दांडक्याने बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेले वडील कमलेश यांना मुलानेच रुग्णालयातही दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आरोपी मुलाला अटक

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात थाटीपूर भागातील खलिफा कॉलनीमध्ये बुधवारी हा प्रकार घडला होता. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर थाटीपूर पोलिस घटनास्थळी दाखल झाली. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला. थाटीपूर पोलिस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

मध्य प्रदेशात मुलीकडून वडिलांची हत्या

दुसरीकडे, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येच 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता.

संबंधित बातम्या :

मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

शेजाऱ्याशी 50 रुपयांवरुन वाद, धडा शिकवण्यासाठी 22 वर्षीय तरुणाने बाळाला टँकमध्ये बुडवलं