बायकोचे आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवले, भावोजींकडून धमकावून बलात्कार

पोलिसांनी आरोपी पतीला अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात केली. मात्र भावोजींनी टोकाचं पाऊल उचलत थेट आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आपल्या तीस लाखांची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

बायकोचे आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवले, भावोजींकडून धमकावून बलात्कार
भावोजींनी धमकावून बलात्कार केल्याचा आरोप
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 12:05 PM

भोपाळ : बायको आंघोळ करताना, कपडे बदलत असतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ नवऱ्याने आपल्या भावोजींना पाठवले. त्यानंतर भावोजींनी हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भावोजींनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

काय आहे प्रकरण?

नवरा आणि भावोजी यांच्या अत्याचाराला कंटाळून विवाहितेने अखेर पोलिसात धाव घेतली. ग्वाल्हेरमधील पडाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करुन त्याची रवानगी तुरुंगात केली. मात्र भावोजींनी टोकाचं पाऊल उचलत थेट आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

गोळी झाडून आत्महत्या

आरोपी भावोजी हे रायपूरमध्ये एका माजी मंत्र्याच्या सुरक्षेसाठी पीएसओ म्हणून तैनात होते. मात्र त्यांनी पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांची सुसाईड नोटही समोर आली आहे.

ब्लॅकमेल केल्याची सुसाईड नोट

मेहुण्याची बायको, अर्थात तक्रारदार विवाहिता आणि सासऱ्यांनी आपल्याला ब्लॅकमेल केल्याचा दावा भावोजींनी सुसाईड नोटमध्ये केला आहे. आपल्याकडे तीस लाखांची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी सुसाईड नोटमध्ये केला आहे.

संबंधित बातम्या :

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपातून क्लीन चिट, संजय राठोड म्हणतात, ‘सत्य…’

CCTV VIDEO | पुण्यात महिलेचा पर्स-मोबाईल लुटून दोघे पसार, पाठलागाचा थरार सीसीटीव्हीत कैद