शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपातून क्लीन चिट, संजय राठोड म्हणतात, ‘सत्य…’

महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपातून क्लीन चिट, संजय राठोड म्हणतात, 'सत्य...'
संजय राठोड
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 10:28 AM

मुंबई : माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपां प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं सूचक ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे. पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकलेले आहे. संजय राठोड यांच्याविरुद्ध अशी कोणतीही तक्रार नाही, असं यवतमाळ पोलिसांनी सांगितलं आहे.

‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही…..’ असं ट्वीट संजय राठोड यांनी केलं आहे. विशेष म्हणजे सीबीआय चौकशीनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हेच वाक्य ट्वीट करत प्रतिक्रिया दिली होती. राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरु असल्याचा आरोप देशमुख यांनी त्यावेळी केला होता.

पोलिसांनी काय सांगितलं?

विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशीअंती माजी मंत्री आणि शिवसेना आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः पाठवलेला नाही.  या अर्जामध्ये महिलेच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीड पोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमूद केलेल्या महिलेचा आणि महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीही संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.

संजय राठोड यांच्यावर कोणते आरोप आहेत?

संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली होती.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांची ट्विटमध्ये खालील माहिती दिली होती. “शिवसेना आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखित सविस्तर तक्रार एका भगिनीने यवतमाळ पोलिसांना पोस्टाने पाठवली आहे. त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो,” असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले होते. मात्र, आता हे पत्र आणि पत्रात नमूद करण्यात आलेली महिला यांचा एकमेकांशी संबंध नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

तक्रार अर्ज खोटा, पतीचे नावही खोटे, शरीरसुखाची मागणी केल्याच्या आरोपामध्ये संजय राठोड यांना क्लीनचीट

बैलगाडा शर्यतीवरुन राजकारण तापलं, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांची मोठी घोषणा

तेव्हा शरद पवारांबाबत कळलं नव्हतं का?; हसन मुश्रीफ यांचा राज ठाकरेंना सवाल

Non Stop LIVE Update
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.