CCTV VIDEO | पुण्यात महिलेचा पर्स-मोबाईल लुटून दोघे पसार, पाठलागाचा थरार सीसीटीव्हीत कैद

रस्त्याने एकट्याने फोनवर बोलत जात असाल, तर खबरदारी बाळगण्याचं आवाहन पुणेकरांना केलं जात आहे. निर्मनुष्य रस्ता असो, किंवा वर्दळीचे ठिकाण, लुटीची घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

CCTV VIDEO | पुण्यात महिलेचा पर्स-मोबाईल लुटून दोघे पसार, पाठलागाचा थरार सीसीटीव्हीत कैद
पुण्यात मोबाईल चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद

पुणे : पादचारी महिलेचा मोबाईल आणि पर्स लुटून चोरांनी पळ काढल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हडपसर भागात दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महिलेने एक किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र ते हाती लागले नाहीत.

नेमकं काय घडलं?

रस्त्याने एकट्याने फोनवर बोलत जात असाल, तर खबरदारी बाळगण्याचं आवाहन पुणेकरांना केलं जात आहे. निर्मनुष्य रस्ता असो, किंवा वर्दळीचे ठिकाण, लुटीची घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे.

मोबाईलसह पर्सची चोरी

रस्त्यावर गाडीची वाट पाहत असलेल्या महिलेला दोघांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागातील यश रवी पार्क सोसायटीच्या समोर हा प्रकार घडला. दिवसाढवळ्या महिलेच्या हातातील मोबाईलसह पर्सची चोरी करण्यात आली.

1 किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलाग

दोघा चोरट्यांनी पर्स आणि मोबाईल हिसकावल्यानंतर महिलेने जवळपास 1 किलोमीटरपर्यंत चोरांचा पाठलागही केला, मात्र त्यांना पकडता आलं नाही. मात्र भामटे चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. या प्रकरणी वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी

दरम्यान, मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन, तिचा महागडा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली होती. मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या सुमारास मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन तिचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाला होता. मात्र कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता.

संबंधित बातम्या :

मूकबधिर तरुणीवर बलात्कार करुन मोबाईल चोरी, कल्याण पोलिसांकडून आरोपीला गुजरातमध्ये अटक

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पळवला, पाठलाग करुन महिलेने चोरट्याला पकडलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI