ती 57 वर्षांची, घरमालकाशी सूत जुळलं, पुढे जे केलं… थरकाप उडवणारा खुनाचा कट समोर!
एक 57 वर्षीय महिला 72 वर्षीय पुरुषासोबत नात्यात होती. मात्र याच 72 वर्षीय व्यक्तीसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Crime News : प्रेम हे कधी आणि कोणावर होईल हे सांगता येत नाही. पण याच प्रेमाने ऐनवेळी दगा दिल्याचीही अनेक धक्कादायक उदाहरणं आहेत. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. एका 57 वर्षांच्या महिलेचे आपल्या 72 वर्षांच्या घरमालकासोबत संबंध होते. मात्र याच घरमालकाची संपत्ती हडप करण्यासाठी 57 वर्षीय महिलेने अंगाचा थरकाप उडवणारं कृत्य केलंय. तिने या 72 वर्षीय व्यक्तीचा खून केल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे तिने अगदी शांत डोक्याने हा खुनाचा कट रचलाय. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
72 वर्षीय घरमालकाचा खून
मिळालेल्या माहितीनुसार हे प्ररण ओडिसा राज्यातील जंगम जिल्ह्यातील आहे. येथे एका 57 वर्षीय महिलेने आपल्या 72 वर्षीय घरमालकाचा खून केला आहे. तिने घरमालकाला पेटवून दिलंय. अंगावर पेट्रोल टाकून तिने घरमालकाचा जीव घेतला आहे. सध्या या महिलेला अटक करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
रॉकेल टाकून आग लावून दिली
खून झालेल्या 72 वर्षीय व्यक्तीचे नाव हरीहर साहू असे आहे. ते सरकारी नोकर होते. साहू गुरुवारी आपल्या घरातल्या खोलीत झोपलेले होते. याच वेळी आरोपी महिला त्यांच्या घरात घुसली आणि रॉकेल टाकून आग लावून दिली. संपूर्ण अंग भाजलेल्या हरीहर साहू यांना नंतर बरहामपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथील डॉक्टरांनी त्यांना कटक येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र साहू यांचा जीव वाचू शकला नाही.
फोन घरातील अंगणात फेकून दिला, अन्…
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार साहू आणि आरोपी महिला यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून संबंध होते. या महिलेने आपल्या घरमालकाचा विचारपूर्वक फक्त खूनच केला असे नाही, तर खुनानंतर या महिलेने संपूर्ण पुरावे नष्ट करण्याचाही तिने प्रयत्न केला. तिने पीडित व्यक्तीचा फोन घरातील अंगणात फेकून दिला. तसेच रॉकेल असलेली बॉटलदेखील तिने आगीती फेकून दिली. तसेच आग लावल्यानंतर स्वत: निर्दोष आहे, हे सांगण्यासाठी आरडाओरडा केला. साहू हे आगीत होरपळत आहेत, असे शेजाऱ्यांना सांगितले.
प्रकरण समोर कसे आले?
मात्र, मृत व्यक्तीची मुलगी मधूस्मीता हिने आरोपी महिलेविरोधात तक्रार केली आहे. मृत साहू यांनी मृत्त्यूशय्येवर असताना मधुस्मिता हिला 57 वर्षीय महिलेनेच माझ्या अंगावर रॉकेल टाकल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणी वैद्यनाथपूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
