Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : डायपरचा असाही वापर ! चक्क सोनं लपवून आणलं पण .. मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्यांना हेरत कस्टम विभागाने त्यांच्याकडून सोन्याची पावडर जप्त केली आहे. त्यांनी मोठी अक्कलहुशारी वापरत ही सोन्याची पावडर लपवली होती , जेणेकरून ती कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना सापडू नये. पण त्यांना हेरण्यात अधिकाऱ्यांना यश मिळालं.

Mumbai Crime : डायपरचा असाही वापर ! चक्क सोनं लपवून आणलं पण .. मुंबई विमानतळावर मोठी कारवाई
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 5:18 PM

मुंबई | 14 सप्टेंबर 2023 : एखादा गुन्हेगार किंवा आरोपी गुन्हा करतानाच अशी एखादी चूक करून बसतो की त्याला पकडण्यासाठीचा किंवा गुन्ह्याची उकल करणारा दुवा तिथेच सापडतो.मुंबईतून अशाच एका गुन्ह्याची मोठी आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर पुन्हा एकदा सोन्याची (gold seized) तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळून लावण्यात आला आहे. आरोपींकडून कोट्यावधींच्या किमतीच सोनं.. नाही नाही, सोन्याची पावडर (gold powder) जप्त करण्यात आली आहे.

आणि ही सोन्याची पावडर लपवण्यासाठी त्यांनी केलेली क्लुप्ती लक्षात येताच अधिकारीही हैराण झाले. १२ सप्टेंबरची ही घटना आहे. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोडी सिंगापूरहून परत येणाऱ्या भारतीय कुटुंबाला अडवले. आणि त्यांच्याकडून सोन्याची पावडर जप्त केली. त्यांनी ती पावडर कुठे लपवली होती माहीत आहे का ? सोन्याची पावडर लपवण्यासाठी आरोपींनी त्यांच्या बाळाच्या डायपरचा वापर केला होता. चक्क डायपरमध्ये सोन्याची पावडर लपवून ते, ती भारतात घेऊन आले.

विमानतळावर काय झालं ?

सिंगापूरहून परतणाऱ्या प्रवाशांकडून मुंबई विमानतळावरील कस्टम्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी 24 कॅरेट सोन्याची पावडर जप्त केली. त्याची किंमत सुमारे 1.05 कोटी रुपये इतकी आहे. 12 सप्टेंबर रोजी हे भारतीय कुटुंब सिंगापूरहून परत येत असताना ही घटना घडली. त्या प्रवाशांनी त्यांच्या अंतर्वस्त्रात आणि तीन वर्षांच्या लहान मुलाच्या डायपरमध्ये सोन्याची पावडर लपवून आणण्याचा प्रयत्न केला होता.

पुण्यातही तस्करी करणाऱ्याला झाली होती अटक

यापूर्वीही परदेशातून येणाऱ्या नागरिकांनी सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. दुसऱ्या देशातून आपल्या देशात सोन्याची तसेच ड्रग्जची तस्करी करणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कालच पुण्यातही अशी घटना उघडकीस आली होती. पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. हा आरोपी दुबई येथून आला होता. तो अवैधरित्या सोन्याची तस्करी करत होता. त्याने कॅप्सूलमध्ये लपवून सुमारे 22 लाख रुपयांचं सोनं आणलं होतं.

तर काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता.छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी सुरु होती. विशेष म्हणजे नामांकित एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचादेखील यात समावेश होता. आरोपीं हे दुबई ते मुंबई अशा हवाई मार्गाने सोन्याची तस्करी करत होते. दुबईवरून सोने घेऊन निघालेला तस्कर मुंबई विमानतळावर उतरताच सोने विमानातील सीटवरच सोडून जात असे. त्यानंतर विमान कंपनीच्या मदतीने सोने विमानतळाबाहेर काढले जायचे अशी माहिती समोर आली होती.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.