AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती अमेरिकेत आणि तो दिल्लीत, 3.3 कोटींची कशी झाली फसवणूक?

काही दिवसांनी महिलेने तिचे क्रिप्टो खाते तपासले तेव्हा तिला धक्काच बसला. खाते पूर्णपणे रिकामे होते. यानंतर महिलेने याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण भारतात पोहोचले. सीबीआयने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

ती अमेरिकेत आणि तो दिल्लीत, 3.3 कोटींची कशी झाली फसवणूक?
crime newsImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 25, 2024 | 7:44 PM
Share

अमेरिकन महिलेसोबत सायबर फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली. दिलशाद गार्डन परिसरात राहणारा लक्ष्य विज याच्यावर अमेरिकास्थित लिसा रॉथ यांची सुमारे 3.3 कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याचा आरोप आहे. ईडीने त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 5 दिवसांच्या ईडी कोठडीवर पाठवण्यात आले आहे. लक्ष्य विज याने त्या महिलेचा लॅपटॉप हॅक केला आणि त्याआधारे त्याने या महिलेची फसवणूक केली. ही घटना 4 जुलै 2024 रोजी घडली होती.

आरोपी लक्ष्य विज याने अमेरिकन महिला लिसा रॉथ यांचा लॅपटॉप हॅक केला होता. त्या महिलेच्या लॅपटॉपवर एक नंबर दाखवला जात होता. महिलेने त्या नंबरवर कॉल केला. त्यावर पलीकडून आरोपीने स्वतःची ओळख मायक्रोसॉफ्टचा एजंट अशी करून दिली. आरोपीने त्या अमेरिकन महिलेला क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये 4 लाख अमेरिकन डॉलर्स ट्रान्सफर करण्यास सांगितले.

काही दिवसांनी लिसा रॉथ यांनी तिचे क्रिप्टो खाते तपासले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांचे खाते पूर्णपणे रिकामे झाले होते. यानंतर महिलेने अधिकाऱ्यांकडे सायबर फसवणुकीची तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरण भारतात पोहोचले. सीबीआयने गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि याप्रकरणी आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन महिलेकडून चोरीला गेलेली रक्कम प्रफुल्ल गुप्ता आणि त्याची आई सारिका गुप्ता यांच्या वॉलेटमध्ये ट्रान्सफर करण्यात आली होती. येथून ही रक्कम वेगवेगळ्या पाकिटांमध्ये जमा केली जात होती. त्यानंतर बनावट नावाने क्रिप्टोकरन्सी विकून ती भारतीय बँक खात्यामध्ये जमा केली जात होती. हा पैसा फेअर प्ले 24 सारख्या बेटिंग ॲपमध्ये वापरला जात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तपास यंत्रणांनी या प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून आरोपींविरुद्ध पुरावे जप्त केले आहेत.

Follow Us
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला