Zoom वर बनावटी आयडीने मॅनेजमेंट क्लासेस, लाखोंची लूट, मुंबईत प्रशिक्षकाला अटक

मॅनेजमेंट क्लासेसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशिक्षक सुशील पारसनाथ मिश्रा याच्यावर आहे. आरोपी बनावट ई-मेल आयडी बनवून पीडितांना अॅडमिशन देण्याचा दावा करत होता

Zoom वर बनावटी आयडीने मॅनेजमेंट क्लासेस, लाखोंची लूट, मुंबईत प्रशिक्षकाला अटक
आरोपी प्रशिक्षक सुशील पारसनाथ मिश्रा

मुंबई : मॅनेजमेंट क्लासेसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या प्रशिक्षकाला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील उत्तर विभाग सायबर सेलने त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी शिक्षक एका कॉलेजमध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि करिअर गायडन्स या विषयावर ट्रेनिंग देत होता.

काय आहे प्रकरण?

मॅनेजमेंट क्लासेसमध्ये प्रवेश देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशिक्षक सुशील पारसनाथ मिश्रा याच्यावर आहे. आरोपी बनावट ई-मेल आयडी बनवून पीडितांना अॅडमिशन देण्याचा दावा करत होता. बनावट झूम आयडी घेऊन तो ऑनलाईन क्लासेस सुद्धा करुन घेत होता.

नऊ लाखांना गंडा

बोरिवलीतील एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलीसाठी एमएमएस म्हणजेच मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजच्या प्रवेशासाठी सुशील मिश्राला नऊ लाख रुपये दिले होते. त्याने बनावट झूम आयडी बनवून मुलीचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली आणि एक आठवड्यातच क्लासेस बंद करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार सुशीलने अशा अनेक जणांना लाखो रुपयांसाठी फसवल्याचा आरोप आहे.

शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे फोटो काढले

दरम्यान, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी एक घटना गेल्या वर्षी समोर आली होती. जालन्यात लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरु असताना पर्यवेक्षकासमोरच एका शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे फोटो मोबाईलवर काढले होते. बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आणून त्याची उत्तरे लिहिली गेली. त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये त्याच्या प्रति काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक

सरकारी शाळेत शिक्षकांकडून 24 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण, दोघांना अटक

(Mumbai Kandivali Cyber Crime Career Guidance Trainer allegedly cheated on name of Online Zoom Classes)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI