AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. मात्र, यादरम्यान एका शिक्षकानेच पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

बारावीच्या पेपरदरम्यान व्हॉट्सअॅपवरुन प्रश्नपत्रिका फोडली, शिक्षकासह आठ जणांना अटक
| Updated on: Feb 23, 2020 | 8:43 AM
Share

जालना : महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे (HSSC Paper Leak On Whatsapp). मात्र, यादरम्यान एका शिक्षकानेच पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला. जालन्यातील परतूरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे तालुक्यात मोठी खळबळ माजली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर हे तालुक्याचं ठिकाण आहे (HSSC Paper Leak On Whatsapp). इथल्या लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची प्रश्नपत्रिका शिक्षकाकडूनच बाहेर पाठवल्या गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा शिक्षक झेरॉक्स सेंटर चालकाला व्हॉट्सअॅपवरून प्रश्नपत्रिका पाठवायचा. तिथून काही जणांचा गट विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम करायचे.

लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची परीक्षा सुरु असताना हॉल क्रमांक 20 वरील पर्यवेक्षकासमोरच या शिक्षकाने प्रश्नपत्रिकेचे मोबाईलवर फोटो काढले. बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आणून त्याची उत्तरे लिहिली गेली. त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये त्याच्या प्रति काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रश्नपत्रिका व्हॉटसअॅपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी निलेश तांबेंसह परतूर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पेपर फोडल्याप्रकरणी आठ जणांवर परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर भांदवी 188 कलम 5, 6, 7 महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड गैरव्यवहार प्रतिबंध अनव्ये गुम्हा दाखल झाला असून शिक्षकासह आठ जणांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कृष्णा साळूदात चव्हाण (वय19), दिनेश अंकुशराव तेलगड (वय 34), रामेश्वर बाबासाहेब उबाळे (वय 22), विषवभर शंकरराव पाष्टे (वय 19), श्याम दत्तात्रय उबाळे (वय 19), शुभम सुधाकर मुळे (वय 18), ज्ञानेश्वर सूंदरराव माने (वय 18) यांच्यासह परीक्षा हॉल क्रमांक 20 च्या पर्यवेक्षकालाही (HSSC Paper Leak On Whatsapp) अटक करण्यात आली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.