नागपुरातील तरुणाचा चोरीचा अनोखा फंडा, ऑनलाईन ऑर्डर, डिलिव्हरी बॉय आल्यावर पाच मिनिटात अफरातफर, नंतर वस्तू परत

| Updated on: Aug 21, 2021 | 3:41 PM

बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचं स्वरुप देखील बदलत आहे. कोण कधी काय करुन फसवेल याचा काहीच नेम राहिलेला नाही. नागपूर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी विचित्रप्रकारे चोरी करायचा.

नागपुरातील तरुणाचा चोरीचा अनोखा फंडा, ऑनलाईन ऑर्डर, डिलिव्हरी बॉय आल्यावर पाच मिनिटात अफरातफर, नंतर वस्तू परत
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नागपूर : बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचं स्वरुप देखील बदलत आहे. कोण कधी काय करुन फसवेल याचा काहीच नेम राहिलेला नाही. नागपूर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा आरोपी विचित्रप्रकारे चोरी करायचा. त्याची फेरफार आणि चोरीची पद्धत बघून पोलीसही चक्रावले आहेत. पण पोलिसांनी या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपीचं नाव पवन श्रीपाल असं असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी चोरी नेमकी कशी करायचा?

आरोपी पवन हा ऑनलाईन पद्धतीने वस्तू खरेदी करायचा. ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू डिलिव्हरी बॉय परिसरात घेऊन आला की आरोपी त्याला 5 मिनिटं थांबवून आपल्या गाडीत बसून त्यातील सामान काढून घ्यायचा. त्यानंतर त्यात साबणासारख्या वस्तू भरायचा आणि पॅकरुन डिलिव्हरी बॉयला परत करायचा. आपल्याकडे सध्या पैसे नाहीत. त्यामुळे घेऊन जा, असं तो कारण द्यायचा. त्याने अनेक दिवस असं कृत्य केलं.

आरोपीला अखेर बेड्या

अखेर आरोपीची चोरी पकडली गेली. अंबाझरी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या चोराचा आणि त्याच्या अनोख्या गुन्हेगारीचा छडा लावत आरोपीला अटक केली. पवनकडून आयपॅड, हेडफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट पकडून जवळपास 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या या कृत्यामागे त्याचा दुसरा कोणी मास्टरमाईंड आहे का? तसेच आरोपी कुठल्या उद्देशाने या गोष्टी करायचा? याचाही तपास पोलीस करत आहेत.

आतापर्यंत डिलिव्हरी बॉय किंवा काही कंपन्यांच्याकडून अशागोष्टी होत असल्याचं पुढे आलं होतं. मात्र आता हा नवीन प्रकार पुढे आल्याने पोलीससुद्धा चक्रावले आहेत. असे प्रकार समोर आल्यास पोलिसांची मदत घेण्यात आवाहन करण्यात आलं आहे.

हेही वाचा :

पोलिसांवर विश्वास नाही, स्वप्निलच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी करा; आई-वडिलांची मागणी

वर्दीला डाग, पोलीस हवालदाराकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जिथे कार्यरत, त्याच पोलीस ठाण्यात बेड्या