Delhi Crime: धक्कादायक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्येच मृतदेह सापडला

| Updated on: Nov 12, 2021 | 6:34 AM

पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. मात्र, न्यायालयाच्या परिसरात जर अशी घटना घडत असेल, तर शहर किती सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला जातोय. 

Delhi Crime: धक्कादायक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्येच मृतदेह सापडला
Tis Hazari Court
Follow us on

नवी दिल्लीः दिल्लीच्या जिल्हा न्यायालयात वकिलाच्या चेंबरमध्ये एक मृतदेह आढळाण्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी वकिलांनी चेंबर उघडले आणि एका तरुणाचा मृतदेह बघून कोर्टाच्या परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या महितीनुसार, तो तरूण कोर्ट परिसरातल्या वकिलांच्या चेंबरमध्ये रात्री झोपायचा. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. तरुणाचा मृत्यू अंमली पदार्थ सेवन केल्याने झाल्याचं सांगण्यात येतय. पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच मृत्यूचे नेमके कारण समजेल. मात्र, न्यायालयाच्या परिसरात जर अशी घटना घडत असेल, तर शहर किती सुरक्षित आहे? असा प्रश्न विचारला जातोय.

गुरुवारी सकाळी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाच्या वकिलांना चेंबर उघतले आणि हा प्रकार समोर उघडकीस आला. पश्चिम विभागातील वकिलाच्या चेंबरमध्ये मृतदेह पडलेला होता. उत्तर दिल्ली जिल्हा डीसीपीनुसार, मनोज असे मृताचं नाव आहे. तो 35 वर्षांचा होता. या घटनेची माहिती तीस हजारी बार असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांना आणि मृतकाच्या ओळखीच्या लोकंना देण्यात आली आहे. मनोज मूळचा बिहारचा असल्याची माहिती मिळाली आहे.

पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा

घटनास्थळी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पंचनामा केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तपास पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृताच्या शरीरावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत. अंतर्गत दुखापत असेल तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कळेल. त्यामुळे मृत्यूच्या तूर्तास मृत्यू ठोस कारण सांगता येणार नाही. सब्जी मंडई पोलीस ठाण्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या मनोज या तरुणाला दारू पिण्याचे व्यसन होते. तो क्षयरोगामूळे दीर्घकाळ आजारी होता.

Other News

VIDEO | गुजरातमध्ये खाजगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस टोल प्लाझामध्ये घुसली; अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद

वडील रिक्षा चालवता चालवता गेले, मामानं कष्टानं डॉक्टर बनवलं, अशोक पालच्या हत्येनं महाराष्ट्रला हुरहुर

(dead body found in the lawyer chamber in Delhi Tis Hazari Court)