AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Car Blast : शिक्षणात अव्वल, 60 लाखाचं पॅकेज, 100 पैकी 99 गुण मिळवणारा डॉक्टर आदिल कसा बनला दहशतवादी?

Delhi Car Blast : TV9 भारतवर्षच्या हाती सहारनपूर येथून अटक करण्यात आलेल्या डॉ.अदिल अहमद राठरच्या शालेय आणि मेडिकल शिक्षणाची कागदपत्र हाती लागली आहेत. ही कागदपत्र पाहिल्यानंतर मनात प्रश्न येतो अभ्यासात इतका हुशार असलेला मुलगा कट्टरपंथी आणि दहशतवादी विचारधारेकडे कसा वळला?

Delhi Car Blast : शिक्षणात अव्वल, 60 लाखाचं पॅकेज, 100 पैकी 99 गुण मिळवणारा डॉक्टर आदिल कसा बनला दहशतवादी?
Delhi Car blast Accused Dr Adil
| Updated on: Nov 19, 2025 | 7:18 PM
Share

दहशतवाद्यांची भरती करणाऱ्यांनी आपली चाल बदलली आहे. आधी कमी शिकलेले, बेरोजगार युवकांना ते आपल्या जाळ्यात ओढायचे. पण आता नवीन मॉड्यूल व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूल समोर आलं आहे. 10 नोव्हेंबरला लाल किल्ला परिसरात झालेल्या कार ब्लास्टमागे व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्यूलचा हात आहे. यात शिकले सवरलेले डॉक्टर, प्रोफेसर आणि इंजिनिअर्सचा सहभाग आहे. दहशतवादी हल्ल्याच्या कारस्थानची ब्लू प्रिंट बनवण्यापासून ते अंमलबजावणीपर्यंत प्रत्येकाचा वेगवेगळा रोल फिक्स आहे.

मागच्या 10 नोव्हेंबरला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या ब्लास्टमध्ये 15 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेने देशाला हादरवून सोडलं. तपास यंत्रणांच्या चौकशीत ज्या गोष्टी समोर आल्या, त्या सर्वांना हैराण करुन सोडणाऱ्या आहेत. i20 कारमध्ये स्फोटकं भरुन हा आत्मघातकी हल्ला घडवण्यात आला. हा दहशतवादी कोणी सामान्य माणूस नव्हता, तर शिकलेला व्यावसायिक डॉक्टर होता. फक्त एकटा डॉक्टर उमरच नाही, तर या सफेदपोश दहशतवादी मॉड्यूलमध्ये बहुतांश डॉक्टर आहेत.

100 पैकी 99 गुण

अभ्यासात हुशार असलेल्या दहशतवादी डॉ.आदिल अहमद राठरला सेकेंडरी क्लासमध्ये गणिताच्या विषयात 100 पैकी 99 गुण, विज्ञानात 100 पैकी 98 गुण आहेत. इतकच नाही, त्याने अव्वल दर्जाने MBBS आणि मेडिसिन MD ची डिग्री घेतली. 2022 साली अनंतनागच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सीनियर रेजिडेंट डॉक्टर होता. आदिल इथूनन सहारनपुरला गेला.

5 पट सॅलरीवर नोकरी

आदिलची हीच हुशारी लक्षात घेऊन फेमस मेडिकेअर रुग्णालय प्रशासनाने त्याला 5 पट सॅलरीवर नोकरी दिली. दहशतवादी डॉ. आदिलला आपल्या रुग्णालयात नोकरी देणारे मनोज मिश्रा त्याच्याबद्दल हे वास्तव समजल्यानंतर हैराण आहेत. त्यांना विश्वास ठेवणं कठिण जातय. इतका शिकलेला पेशामध्ये माहिर असलेला डॉक्टर दहशतवादी डॉक्टर कसा असू शकतो?.

स्वभावाने तो भरपूर कंजूस

फेमस रुग्णालयाआधी आदिल सहारनपुरच्या वी-ब्रॉस रुग्णालयात नोकरी करायचा. रुग्णालयाच्या वाइस प्रेसिडेंट डॉ. ममता यांच्यानुसार, “आदिल वेळ आणि कामाच्या बाबतीत एकदम पंचुअल होता. रुग्ण आणि रुग्णालय स्टाफसोबत त्याचा व्यवहार चांगला होता. कामाशिवाय कोणाशी बोलायचा नाही” डॉ. ममता यांच्यानुसार, “आदिलने ऑनलाइन नोकरीसाठी अप्लाय केला होता. स्वभावाने तो भरपूर कंजूस होता. दर महिन्याला चार लाखापेक्षा पण जास्त कमावून फक्त 250 रुपयांची जीन्स पॅन्ट घालायचा. शेअर ऑटोने रुग्णालयात यायचा”

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.