AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लुटारू नव्हते ते निर्दयीच… कार लुटली… ड्रायव्हरला भररस्त्यातून फरफटत नेलं; काय घडलं ‘त्या’ रोडवर?

मंगळवारी रात्री उशीराच्या सुमारास IGI एअरपोर्ट जवळ नॅशनल हायवे -८ वर एका इसमाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. या थरारक घटनेमुळे कंझावाला केसच्या पुन्हा जिवंत झाल्या. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लुटारू नव्हते ते निर्दयीच... कार लुटली... ड्रायव्हरला भररस्त्यातून फरफटत नेलं; काय घडलं 'त्या' रोडवर?
| Updated on: Oct 11, 2023 | 3:06 PM
Share

नवी दिल्ली | 11 ऑक्टोबर 2023 : राजधानी दिल्लीत कंझावाला केसप्रमाणे आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी रात्री एका टॅक्सी ड्रायव्हरची हत्या करण्यात आली. त्याची गाडी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या लुटारूंनी त्याला धडक दिली आणि रस्त्यावर बरंच अंतर त्याला फरपटत नेलं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रात्री उशीरा ११.३०च्या सुमारास IGI एअरपोर्ट जवळ नॅशल हायवे क्रमांक ८ येथे एका इसमाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला असून एकच खळबळ माजली.

मृत इसम फरीदाबादचा रहिवासी

विजेंद्र (वय 43) असे मृत इसमाचे नाव असून ते मूळच फरीदाबाद येथील रहिवासी असल्याचे समजते. रिपोर्टनुसार, विजेंद्र हे महिपालपूर भागात त्यांची टॅक्सी चालवत होते. त्याचवेळी लुटारूंच्या एका टोळीने त्यांची गाडी लुटण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर खाली उतरवून टॅक्सी ताब्यात घेतल्यानंतर ते लुटारू टॅक्सी घेऊन पळून जायला लागले. मात्र ड्रायव्हरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्याला जोरदार धडक दिली आणि सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत ते त्याला रस्त्यावरून तसेच फरपटत घेऊन गेले.

महिपालपूर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मूळ ड्रायव्हर कारला लटकून फरपटत जात असल्याचे त्यात दिसत आहे. या घटनेत डोक्याला गंभीर मार लागल्याने आणि फरपटत गेल्याने त्या ड्रायव्हरचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात हल्लेखोर-लुटारूंविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांचा वेगाने तपास सुरू केला आहे. ही घटना ज्या रस्त्यावर घडली तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी देखील पोलिस करत आहेत. पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

कंझावाला केसच्या आठवणी झाल्या ताज्या

यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये एक सहा वर्षांचा मुलगा ट्रकच्या खाली सापडून फरपटत गेल्याने मृत्यूमुखी पडला होता. तर त्यापूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्लीतील कंझावाला भागात एका २० वर्षीय तरूणीला एसयूव्हीने धडक देऊ तिला १३ किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याप्रकरणाने राजधानी हादरली होती. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होता. त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज अंगावर काटा आणणारं होतं. तिला कारपासून दूर हटवण्यासाठी आरोपींनी बराच वेळ कार इकडे-तिकडे फिरवली होती.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.