AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरा बाहेर झोपल्यावर वहिनीने दीराला बोलावलं खोलीत, पतीचा डोळा उघडला अन्…. धक्कादायक घटना समोर

एका व्यक्तीला त्याची पत्नी आणि भाऊ दोघे अंथरूणातच सापडतात त्यानंतर जे होतं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नवरा बाहेर झोपल्यावर वहिनीने दीराला बोलावलं खोलीत, पतीचा डोळा उघडला अन्....  धक्कादायक घटना समोर
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 11, 2023 | 1:36 PM
Share

लखनऊ : लग्न झाल्यावरही अनेकांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. विवाहबाह्य संबंधामध्ये सर्वात जास्त अनैतिक संबंध हे घरातील संबंधित महिलेचे दीर किंवा दुसऱ्या कोणत्यातरी पुरूषासोबत असल्याचं कानावर आलं असेल. काही प्रकरणांमध्ये तर विवाहित पती किंवा पत्नी आपला संसार मोडून दुसऱ्यासोबत निघून जायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे ज्यामध्ये धाकट्या भावाचेच आपल्या वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस दोघे अंथरूणातच सापडतात त्यानंतर जे होतं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

ही घटना उत्तर प्रदेशमधील आहे. लहान भावाचे त्याच्याच मोठ्या भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असतात. विवाहित महिलेला तीन मुले असतात. एक दिवस तिचा पती जेवण झाल्यावर बाहेर चालायला जातो, याच संधीचा फायदा घेत लहान भाऊ वहिनीच्या खोलीत जातो. काही वेळानंतर महिलेचा पती माघारी चालून येतो त्यावेळी दोघेही सावध असतात आणि योग्य वेळ पाहून लहान भाऊ खोलीच्या बाहेर पळ काढतो.

मोठा भाऊ चालून आल्यावर बाहेर व्हरांड्यामध्ये झोपण्यासाठी जातो. काही वेळाने महिलाच तिच्या दीराला आतमध्ये खोलीत बोलावते. काही आवाज होतो ज्याने झोपलेल्या भावाचा डोळा उघडतो आणि तो घरात जातो. मात्र हे आतमध्ये असलेल्या दोघांच्याही लक्षात येत नाही. नवरा घरात आल्याने महिला काहीशी गोंधळते आणि आपल्या मुलाला जवळ घेते. मात्र तिच्या पतीला संशय येतो आणि तो चादर ओढतो. त्यावेळी त्याचा लहान भाऊ तिथे झोपलेला पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जाते.

दोघांमध्ये धरपकड होते मात्र लहान भाऊ त्याला मारहाण करतो, शेवटी तो तिथून कसाबसा पळ काढतो. दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन गाठतो. सेहरामाऊ पोलीस स्टेशनचे प्रभारी कमलेश कुमार मिश्रा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम!
अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस... ना अन्न, ना पाणी! तरीही जगण्याची आस कायम! 75 वर्षीय आजींच्या धैर्याची कहाणी थक्क करणारी
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत....
मुंबईकरांच्या खिशाला महागाईचा मोठा फटका; दूधापासून CNG-PNG पर्यंत सर्वच महागलं
भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...
Sanjay Raut | भाजपाचे नेते भाषण माफिया; जीडीपी वाढला म्हणता मग...संजय राऊतांचा मोदी-फडणवीसांवर घणाघाती हल्ला
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप? ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर; ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा
फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन्....
Video | फलटणच्या रुग्णालयात पुन्हा डॉक्टरने जीवन संपवलं; राजकीय धमकी अन् प्रशासकीय छळाच्या आरोपांनी प्रकरणाला नवं वळण!
जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Health Issues | मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; डॉक्टरांची धावपळ, मात्र उपचार घेण्यास नकार
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद