
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गोविंदपुरममध्ये आयबीमध्ये अविनाश आणि त्याची बहीण अंजली यांनी आत्महत्या केली आहे. बहीण अंजलीने आत्महत्येपूर्वी 22 पाने सुसाईड नोट लिहिली होती. अंजलीने रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) या दोघांव्यतिरिक्त आमच्या मृत्यूला दुसरे कोणीही जबाबदार नाही असं म्हटलं आहे.
पुढे बोलताना अंजलीने म्हटले की महीम (मित्र) माझ्या खात्यातील पैसे आणि पीएफचा वारसदार असेल. मिस रितू आणि सुखवीर सिंग यांनी माझ्या माझ्या मृतदेहाला हात लावू नये. फक्त महीम माझ्या चितेला अग्नी देईल. अंजलीने सुसाईड नोटच्या पानांचा फोटो तिचे वडील सुखवीर सिंग, सावत्र आई रितू, मावस काका अनिल सिंग आणि मावशी रेखा राणी यांना व्हॉट्सअॅपवर पाठवले आहेत.
अविनाश आणि अंजलीने या भावंडांनी गुरुवारी आत्महत्या केली होती. कुटुंबातील सदस्यांनी यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. शुक्रवारी रूनची झडती घेताना पोलिसांना डायरीत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली होती. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
वडील सावत्र आईवर विश्वास ठेवतात
अंजलीने डायरीत लिहिले की, रीतिरिवाजमुळे वडील सुखवीर सिंग आणि सावत्र आई रितू तिला मानसिक त्रास देतात. वडील सावत्र आईवर विश्वास ठेवतात. बाबा, एखाद्याला फक्त मुलाला जन्म देणे आणि शाळेची फी भरणेच नाही तर त्याच्यासोबत वेळ घालवणे, त्यांच्या इच्छा पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. माझ्या भावाला कठोर परिश्रम करून सरकारी नोकरी मिळाली आहे. त्याचे शोषण झाले आहे, तो त्याच्या मित्रांसोबत बाहेरही जाऊ शकत नाही.
अंजलीने पुढे म्हटले की, ‘सुखवीर सिंग मला तुम्हाला बाबा म्हणायला आवडत नाही. तुम्हाला माझ्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा दाबला आहे. मामा देवेंद्र आणि मामा अनिल यांना उद्देशून तिने लिहिले की, तुम्ही लोक नातेवाईक आहात पण आजपर्यंत तुम्हाला आमच्या स्थितीबद्दल माहिती नाही.
माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले
अंजलीने सुसाईड नोटमध्ये म्हटले की, सावत्र आईने माझ्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले, माझी बदनामी केली आणि त्यांनी मला वाईट म्हटले. अशा परिस्थितीतही माझे वडील गप्प राहिले. काही लोक म्हणतील की मी वाईट आहे. मला माहित आहे की मी माझ्या सावत्र आईसोबत 16 वर्षे कशी घालवली आहेत. यासह अनेक आरोप अंजलीने सावत्र आई आणि बापावर केले आहेत.