
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात 31 वर्षीय डॉक्टर महेंद्रला अटक केल्यानंतर जे सत्य समोर आले ते ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या डॉक्टरने थेट पत्नीची हत्या केली. पोलिसांनी पतीला अटक केली असून तपास सुरु आहे. तसेच पतीने पत्नीची हत्या का केली हे देखील उघड झाले आहे. आता नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया…
कर्नाटकची राजधानी बंगळूरू येथे डॉक्टर कृतिका एम. रेड्डी यांच्या रहस्यमय मृत्यूचे गूढ उलघडले आहे. पोलिसांनी सोमवारी मृत महिलेच्या पती आणि सर्जन डॉ. महेंद्र रेड्डी जी.एस. यांना अटक केली. तपासात उघड झाले की डॉ. महेंद्र यांनी आपल्या पत्नीला प्रोपोफोल (Propofol) नावाचे शक्तिशाली एनेस्थेटिक औषध देऊन हत्या केली. आता पत्नीच्या हत्येचे कारणही समोर आले आहे.
वाचा: हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड लवकरच देणार गूडन्यूज, सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट
महेंद्र आणि २८ वर्षीय कृतिका यांचा विवाह गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला होता. डॉक्टर महेंद्र यांची पत्नी कृतिका एम. रेड्डी या देखील डॉक्टर होत्या. त्या व्यवसायाने डर्मेटॉलॉजिस्ट होत्या. यावर्षी एप्रिलमध्ये अचानक कृतिकाचा मृत्यू झाला. त्या गॅसच्या आजाराने त्रस्त होत्या आणि डॉक्टर महेंद्रच त्यांच्यावर उपचार करत होते. तेव्हा सर्वांना असे वाटले की आजारानेच कृतिकाचा जीव घेतला आहे. पण फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) च्या अहवालाने संपूर्ण केसने वेगळे वळण घेतले.
गॅसच्या आजाराने त्रस्त होती कृतिका
खरं तर, डॉक्टरने सहा महिन्यांपूर्वी पत्नीला हाय डोस एनेस्थेसियाचा इंजेक्शन देऊन मारले होते. पत्नीच्या मृत्यूला नैसर्गिक मृत्यू दाखवण्यासाठी त्याने पूर्ण कट रचला होता. पण पोस्टमॉर्टम अहवालात खरे समोर आले. पोस्टमॉर्टम अहवालात महिलेच्या शरीरात एनेस्थेसिया आढळले. ACP रमेश बनोथ यांच्या म्हणण्यानुसार, पतीचा दावा असा आहे की कृतिका दीर्घकाळापासून आजाराने त्रस्त होती आणि तो तिच्यावर उपचार करत होता. पोलिस सूत्रांच्या मते, कृतिकाच्या आजाराने महेंद्र वैतागला होता. लग्नानंतर काही वेळातच महेंद्रला कळले की कृतिका अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांशी झुंजत आहे. कृतिकाच्या कुटुंबीयांनी ही माहिती त्याच्यापासून लपवली होती, याच कारणाने महेंद्र रेड्डीने कृतिकाचा जीव घेतला.
डॉ. महेंद्रचा गुन्हेगारी इतिहास
चौकशीत हेही समोर आले की डॉ. महेंद्र यांनी याआधीही काही गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर फसवणूक आणि धमकी देण्यासारखे अनेक गुन्हे आधीपासून नोंदवलेले आहेत. आता पोलिसांनी या केसमध्ये हत्येच्या कलमांचाही समावेश केला आहे. मृत महिलेच्या वडिलांच्या सांगण्यावरून या केसची पुन्हा तपासणी सुरू करण्यात आली होती.