Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल

डोंबिवलीत किरकोळ कारणावरून एका युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage) कैद झाली असून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय.

Dombivli Crime : डोंबिवलीत किरकोळ कारणावरून युवकाला मारहाण, सीसीटीव्ही बघाल तर थक्क व्हाल
युवकाला जमावाकडून मारहाण
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 25, 2022 | 4:16 PM

डोंबिवली : आजकाल किरोकळ कारणाचा वाद कुठपर्यंत जाईल सांगता येत नाही. कारण किरकोळ कारणावरून आता टोकाची हिंसा (Crime) पेटताना दिसून येत आहे. असेच एक उदाहरण डोंबिवलीत (Dombivli) घडले आहे. डोंबिवलीत किरकोळ कारणावरून एका युवकाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडलीये. ही घटना सीसीटीव्हीत (CCTV Footage) कैद झाली असून मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय. गेल्या काही दिवसांत अशा घटना या परिसरात वाढल्या आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही बारकाईने पाहिले तर सुरूवातील काहीतरी वाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आजुबाजुचा जमाब या एका तरुणावर तुटून पडताना दिसूनत आहे. मारत, ढकलत या तरुणाला बाजुला असलेल्या रिक्षाला धडकवले आहे. त्यानंतर त्याला खाली पाडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे.

मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज

मारहाण झालेला तरुणा कोण?

डोंबिवलीच्या आजदे गाव परिसरात निखिल पाटील हा तरुण वास्तव्याला आहे. काल दुपारच्या सुमारास तो एका मित्रासह घराजवळ एका रिक्षेत बसला होता. यावेळी तिथे असलेल्या काही जणांसोबत त्याचे आणि त्याच्या मित्राचे किरकोळ कारणावरून वाद झाले. त्यामुळे 7 ते 8 जणांनी त्याला मारहाण केली. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली. याप्रकरणी निखिलच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केलेला नसल्याची तक्रार निखिलच्या कुटुंबीयांनी केलीये. तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केलीये. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सध्या काहीही बोलण्यास नकार दिलाय. त्यामुळे पोलिसांची अधिकृत बाजू अजूनही समोर आलेली नाही.

पोलीस आता काय कारवाई करणार?

या वादात फक्त जमावच नाही तर काही महिलाही दिसून येत आहेत. यात नेमका कुणाचा काय रोल होता आणि नेमका वाद काय होता हे पोलिसांची बाजू समोर आल्यानंतरच कळेल. या मारहाणीनंतर या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुवातील काही जणांना या युवकाला शिवीगाळ केली, त्यानंतर त्याचा जाब विचारला असाता त्या युवकाने आणि त्याच्या नातेवाईकांनी या युवकाला मारहाण केली, असा युवकाच्या नातेवाईकांचा आरोप आहे .पोलिसांनी येऊन जबाब नोंदवला आहे. मात्र अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे. सहा ते सात जणांनी मला मिळून मरहाण केल्याचे या युवकाने म्हटले आहे. त्यामुळे पोलीस आता या प्रकरणात काय कारवाई करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Breaking : तब्बल 205.6 किलो हेरॉईनसह 394 मेट्रिक टन जिप्सम पावडरही जप्त! गुजरातमध्ये पुन्हा मोठा अंमलीसाठा हस्तगत

4 वर्षांचा चिमुरडा स्विमिंग पूलमध्ये बुडाला! दिंडोशीमधील घटना, आई ट्रेनरशी बोलत राहिली आणि…

Aurangabad | औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत काय घडला प्रकार?