AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला सीईओचा अपघाती मृत्यू , ड्रायव्हरचे लायसन्स इतक्या महिन्यांसाठी सस्पेंड होणार

मुंबई वाहतूक पोलीसांनी वरळी सीईओ अपघाती मृत्यू प्रकरणासह दोन प्रकरणातील वाहन चालकांचे लायसन्स सस्पेंड करण्याची शिफारस आरटीओला केली आहे.

महिला सीईओचा अपघाती मृत्यू , ड्रायव्हरचे लायसन्स इतक्या महिन्यांसाठी सस्पेंड होणार
ceo rajlakshmiImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 22, 2023 | 5:30 PM
Share

मुंबई :  रविवारी जॉगिंग करताना महिला सीईओ राजलक्ष्मी यांना आपल्या भरधाव कारने ठोकरून त्यांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याच्या प्रकरणातील रॅश ड्रायव्हरचे ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड करण्याची शिफारस मुंबई पोलीसांनी प्रादेशिक परिवहन विभागाला केली आहे. एका बड्या कंपनीच्या सीईओ असलेल्या राजलक्ष्मी विजय यांचा भरधाव टाटा निक्सॉनने उडविल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की राजलक्ष्मी तब्बल 20 फूट अंतररावर जाऊन पडल्या होत्या.

वरळी सी अपघातातील चालकासह मुंबईतील दोघा ड्रायव्हरचा वाहन चालक परवाना सस्पेंड करण्याच्या सूचना आरटीओला केल्या आहेत.  पुणे येथील एका टेक्नो फर्मच्या महिला सीईओ राजलक्ष्मी यांना त्या जॉगिंग करीत असताना वरळी सी फेस येथे एका भरधाव टाटा निक्सॉन ठोकरल्याने त्यांचा रविवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील चालकाचे ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन विभागाला करण्यात आली आहे. पहिली घटना ड्रंक ड्रायव्हिंगची असून त्यात विश्वास अट्टावर यांची पत्नी शीतल यांचे लायसन्स तीन वर्षीय मुलीच्या अपघाती मृत्यू प्रकरणात सस्पेंड करण्याची शिफारस केली आहे. मार्च 2018 ते मार्च 2023 मध्ये रॅश आणि धोकादायक पद्धतीने ड्रायव्हींग केली आहे.

किमान तीन महिने ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड

दुसरी घटना अर्थात वरळी सी फेसच्या सीईओच्या अपघाती मृत्यूची असून त्यात बिजल धर्मेश मर्चंट याने तीनदा रॅश ड्रायव्हिंग केल्याने त्याचे लायसन्स सस्पेंड करण्याची शिफारस केल्याचे सह पोलीस आयुक्त ( वाहतूक ) प्रवीण पडवळ यांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले. या प्रकरणात किमान तीन महिने ड्रायव्हींग लायसन्स सस्पेंड केले जाते.

Linkedin वरील पोस्ट पुन्हा व्हायरल

राजलक्ष्मी विजय यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन – 2023 मध्येही सहभाग घेतला होता. त्यांची Linkedin वरील पोस्ट पुन्हा व्हायरल झाली आहे, त्यात त्यांनी रोनाल्ड रूक यांचे एक वाक्य प्रसिद्ध वाक्य पोस्ट केले होते. त्यात म्हटले होते की ‘माझ्या जीवनाचे दिवस वाढावेत म्हणून मी धावत नाही, तर माझ्या दिवसांत जीवन वाढावे म्हणून मी धावते आहे.’

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...