ED Action On Anil Ambani : अनिल अंबानींचे दिवस फिरले, राहतं 17 मजली घर जप्त, प्रतिष्ठेवर घाव, पाली हिलच्या या इमारतीची किंमत किती हजार कोटी? यात काय खास?
ED Action On Anil Ambani : प्रवर्तन निदेशालय ED ने आज जी कारवाई केली, तो एकप्रकारे अनिल अंबानी यांच्या प्रतिष्ठेवर घाव आहे. पाली हिलच आलिशान घर आता सरकारच्या नियंत्रणाखाली असणार आहे. या आलिशान इमारतीचा आजचा बाजारभाव काय आहे? त्यात काय खास आहे?

प्रवर्तन निदेशालयाने (ED) आज उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात मोठी कारवाई केली. त्यांची जवळपास 3,084 कोटीपेक्षा अधिकची संपत्ती अस्थायी जप्त केली. ईडीने हे पाऊल 31 ऑक्टोंबर 2025 रोजी मनी लॉन्ड्रिंग निवारण अधिनियम (PMLA) अंतर्गत उचललं आहे. जी प्रॉपर्टी जप्त केलीय, त्याची यादी मोठी आहे. यात मुंबईस्थित वांद्रे येथील पाली हिलचं पॉश घर आहे. पाली हिलमध्ये अनिल अंबानी यांचं 17 मजली आलिशान घर आहे. तिथे अनिल अंबानी आपल्या कुटुंबासोबत राहतात. अनिल अंबानी यांचं पाली हिलच हे घर म्हणजे श्रीमंती आणि प्रतिष्ठेच प्रतीक होतं. आता मनी लॉन्ड्रिंग केस फाइल्समध्ये जप्त संपत्ती बनलं आहे. यात फक्त मुंबईच घर नाही, तर आठ शहरातील संपत्ती आहे.
पाली हिल येथील ही 17 मजली इमारत पश्चिम मुंबईच्या अपमार्केट भागात आहे. 16 हजार वर्गफुटामध्ये पसरलेलं आणि 66 मीटर उंच या शानदार इमारतीचं नाव Abode आहे. यात प्रत्येक प्रकारची लग्जरी सुविधा आहे. एका अब्जाधीशाच्या स्वप्नात असतं, तसच हे घर आहे. या इमारतीत एक स्विमिंग पूल, जीमनेजियम, एक मोठं गॅरेज आहे. त्यात अंबानी कुटुंबाच्या लग्जरी कारस आहेत. इतकच नाही, इमारतीच्या छतावर हेलिपॅड आहे. तिथून काही हेलिकॉप्टर्स ऑपरेट होतात. Houesing.com ने या प्रॉपर्टीची किंमत 5000 हजार कोटीच्या घरात असल्याच सांगितलं. अनिल अंबानी कुटुंबासह या घरात राहतात. आता ही सर्व संपत्ती सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.
कुठली-कुठली संपत्ती जप्त केली?
NDTV रिपोर्ट्नुसार, प्रवर्तन निदेशालयने एकूण 3084 कोटी मुल्याची संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई 31 ऑक्टोंबर रोजी जारी झालेल्या आदेशानंतर करण्यात आली. ईडीनुसार, ही संपत्ती प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत जप्त केली आहे. यात दिल्लीतील रिलायन्स सेंटर, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई आणि आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरीपर्यंत पसरलेल्या प्रॉपर्टीचा समावेश आहे. या संपत्तीमध्ये रहिवाशी फ्लॅट, ऑफिस स्पेस आणि जमिनीचे तुकडे आहेत.
या कंपन्या ईडीच्या रडारवर
Reliance Home Finance Ltd (RHFL) आणि Reliance Commercial Finance Ltd (RCFL) या रिलायन्स ग्रुपच्या दोन आर्थिक कंपन्या ईडीच्या रडारवर आहेत. सामान्य जनता आणि बँकांकडून घेतलेला पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला असा या कंपन्यांवर आरोप आहे.
