
बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावचे माजी उपसरंपच असलेल्या गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. घरी मुलं, बायको, कुटुंब असतानाही ते कलाकेंद्रातील पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad)प्रेमात पडले. अवघ्या 21 वर्षांच्या पूजानेही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिचा चांगलाच फायदा करून घेतला. तिच्याच प्रेमात वेडा झालेल्या गोविंद बर्गे यांनी गेल्या सोमवारी टोकाचं पाऊल उचलतं आयुष्य संपवलं.त्यांच्या मृत्यूमुळे ोठी खळबळ माजली असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी नर्तिका पूजाला अटक केली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांच्या चौकशीतून रोज नवनवे खुलासे होत आहेत.
वर्षभरापासून गोविंदकडून अनेक गोष्टी , महागडा मोबाईल, दागिने , पैसे घेणाऱ्या पूजाचा गोविंद याच्या गेवराईच्या बंगल्यावर डोळा होता. तो बंगला नावावर करण्यासाठी ती मागे लागली आणि ब्लॅकमेलही करत होती. त्याच सततच्या मागण्या, धमक्यांमुळे गोविंद तणावात होता. माझं ऐकलं नाही तर तुझ्य़ावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही पूजाने त्याला दिली होती. यामुळे निराश झालेल्या गोविंदने शेवटचा उपाय म्हणून सासुरे गावात जाऊन पूजाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तिला व्हिडीओ कॉलही केला, मात्र ती त्यांच्याशी बोललीच नाही , अखेर ते तिथून निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.
मरताना गोविंदच्या खिशात किती रुपये ?
आता याच प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. वर्षभरात गोविंदने पूजाला अनेक भेटी दिल्या, घरखरेदीसाठी आर्थिक मदत केली, एक प्लॉटही विकत घेऊन दिला. थोडक्यात काय तर त्यांनी तिच्यावर अक्षरश: पाण्यासारख3 पैसा उधळला. मात्र त्याच गोविंद बर्गेच्या मृत्यूसमयी त्यांच्या खिशात अवघे 900 रुपये होते अशी महत्वाची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ज्या कारमध्ये गोविंदचा मृतदेह सापडला, त्या कारमध्ये बिअरचे काही कॅन सापडले अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
पूजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
गेल्या आठवड्यात गोविंद बर्गेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं. कोर्टाने तिला पोलीस कोठडी ठोठावली होती , काल मुदत संपल्यावर तिला पुन्हा कोर्टात हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आठवडाभरात पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केली असून त्यातून अनेक महत्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. आपले व गोविंदचे प्रेमसंबंध असल्याचे तिने कबलू केले.
एवढेच नव्हे तर ते दोघे पक्त कलाकेंद्रातच नव्हे तर कधी फ्लॅटवर, कधी घरी तर कधी कधी बीड आसपासच्या लॉजमध्येही सोबत रहात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी फक्त पूजा गायकवाड हिचीच नव्हे तर तिचे सहकारी आणि तिच्या काही मैत्रिणी यांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत.
तर गोविंदचा जीव वाचला असता ?
पूजाने गोविंदकडे गेवराईच्या बंगल्याची मागणी केली होती. तसेच त्याच्या नावे असलेली जमीन भावाच्या नावे करण्याचीही तिची मागणी होती. मात्र गोविंदने ते ऐकण्यास नकार दिला. तेव्हापासूनच पूजाचं वागणं बदललं. ती त्याच्याशी बोलणं, भेटणं टाळू लागली, फोनही उचलायची नाही. बराच प्रयत्न करूनही ती तिच्या मागण्या सोडत न्वहीत, उलट गोविंदलाचा ब्लॅकमेल करत होती. घटनेच्या दिवशीही गोविंदने तिला खूप फोन केले, पण ती भेटली ाही म्हणून तिची समजूत काढण्यासाठी तो सासुरे गावातील तिच्या घरी गेला.
तिथे पूजा नव्हती, गोविंदेन तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फारशी दाद दिली नाही. सगळीकडून कोंडी झाल्यानंतर गोविंद हे पूजाच्या आईच्या घरासमोर गेला आणि त्याने व्हिडीओ कॉलवर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र समोरून कोणीच प्रतिसाद दिला नाही. अखेर तो तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासूनच काही अंतरावर कारमध्ये त्याचा मृतदेह सापडला. तेव्हा पूजा त्यांच्याशी बोलली असती तर कदाचित गोविंद बर्गेंचा जीव वाचला असता