Govind Barge Death : गोविंद बर्गे प्रकरणात मोठी माहिती, त्याचा मोबाईल बंद आणि.. शेवटच्या 5-6 दिवसांत काय घडलं ? मित्रांनी काय सांगितलं ?
गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह त्यांच्या गाडीत सापडला.नातेवाईकांनी घातपाताचा आरोप केला आहे. नर्तकी पूजा गायकवाड यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप आहे आणि तिला अटक करण्यात आली आहे. गोविंद बर्गे यांना मानसिक त्रास होता आणि त्यांनी मित्रांसमोर मन मोकळं केलं होतं.

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge Death) यांचा गाडीत मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ माजली. मंगळवारी रात्री सासुरे गावात कारमध्ये बर्गे हे मृतावस्थेत आढळले. त्यांनी आत्महत्या केली असे बोलले जात असले तरी बर्गे यांनी जी दिला नाही तर त्यांच्यासोबत घातपात झाला असा नातेवाईकांचा आरोप असल्यामुळे या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. घातपाता आरोप केला जात असल्याने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे. दरम्यान याप्रकरणी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड (वय 21) हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी काल तिला न्यायालयात हजर केले असता तिला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान आता याच मृत्यूप्रकरणात एक मोठी अपेडट समोर आली आहे. मृत्यूपूर्वी गोविंद हे तणावात होते, मानसिक दृष्ट्या त्यांना खूप त्रास होत होता, आपल्या मित्रांशीही ते त्यांच्या त्रासाबद्दल बोलले होते अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासात काही अपडेट्स समोर आले असून मित्रांनी अनेक तपशील सांगितले आहेत.
मित्रांकडे मोकळं केलं मन
गोविंद बर्गेच्या मृत्यूमुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असून ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय नातेवाईक, कुटुंबिय आणि मित्रांनी व्यक्त केला असून सखोल तपासाची मागणी केली आहे. दरम्यान गोविंद यांच्या मित्रांकडून महत्वाची माहिती देखील उघड झाली आहे. गोविंदचं पूजावर प्रेम होतं, पण ती त्याच्याकडे सतत मागण्या करत होती. गेवराईचा बंगला नाावर कर, पाच एक जमी भावाच्या नावे कर अशा मागण्या सातत्याने तिच्याकडून केल्या जात होत्या. एवढंच नव्हे तर मागण्या मान्य केल्या नाही तर दुष्कर्म केल्याचा आरोप करेन, गुन्हा दाखल करेन अशा धमक्याही पूजाने गोविंदला दिल्या होत्या.
पूजाकडून सतत मिळणाऱ्या धमक्या आणि ब्लॅकमेलिंग, पैशांचा लावलेला तगादा यामुळे गोविंद खूप निराश झाला होता, मानसिकरित्या खचला होता अशी माहिती समोर आली आहे. त्याचा मित्र चंद्रकांत याच्याशीही तोय विषायवर बोलला होता, त्याच्याकडे मन मोकळ केलं होतं. मी खूप निराश झालो आहे, असंही त्याने मित्राला सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कलाकेंद्र बांधण्यासाठी गोविंदने पूजाला लाखो रुपये दिले होते तसेच सासुरे गावात घर बांधण्यासाठी देखील त्याने मदत केली होती. तो तिचे सगळे हट्ट पूर्ण करायचा, मात्र तरीही पूजाच्या मागण्या, पैशांचा तगाद वाढतच चालला होता. गेवराईतला बंगला देखील नावावर करून दे अशी मागणी तिने केली होती. एवढंच नव्हे तर गोविंदच्या नावे असलेली पाच एकर जमीन माझ्या भावाच्या नावे करून दे, असाही तगाद तिने गोविंदकडे लावला होता. पण गोविंद तिचं ऐकत नव्हता, हे पाहून पूजाने त्याच्याशी बोलणं बंद केलं. गोविंदा तिला सतत फोन करायचा, भेटण्याचाही प्रयत्न करायचा मात्र त्याला यश आलं नाही.
मोबाईल बंद, 5-6 दिवसांत काय घडलं ?
या सर्व घटनांमुळे गोविंद निराश होता, असं मित्रांनी सांगितलं. आम्ही रोज त्यांच्यासोबत होतो, गोविंद बर्गे आत्महत्या करतील असं वाटत नाही असं मित्रांनी सांगत घातपाताचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली. हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असू शकतो असेही ते म्हणाले. गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोविंद हे मानसिक तणावात होते, त्यांचा मोबाईलही बंद होता अशी माहितीही मित्रांनी दिली. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून गोविंदचा कुणाशीही संपर्क नव्हता. त्यांचा फोनही लागत नव्हता, त्यांचा कुणाशीही संवाद नव्हता असं सांगत हा घातपाचा प्रकार असू शकतो या संशयाचा मित्रांनी पुनरुच्चार केला.
काय आहे प्रकरण ?
गेल्या वर्षी 2024 मध्ये गोविंद बर्गे यांची धाराशिवमधील कलाकेंद्रात नर्तकी पूजाशी ओळख झाली. त्याचा फायदा घेत गोविंद हे विवाहीत असल्याचे, त्यांना 2 मुलं असल्याचे माहीत असूनही पूजाने त्यांच्याशी प्रेमसंबध ठेवले. तिच्या प्रेमात पडलेल्या गोविंद यांनी तिला वर्षभरात अनेकदा पैसे, जमी, सोनं-नाणं, तसेच महागडा मोबाईलही दिला. भावाच्या नावावर पाच एकर शेती करा अशी मागणी ती गोविंद यांच्याकडे करत होती, ती त्यांच्याशी बोलतही नव्हती, अखेर तिला समजावण्यासाठी रात्री गोविंद हे तिच्या सासुरे गावी गेले. तिथे त्यांच्यात नेमकं काय झालं, काय बोलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासीन काही अतंरावर एका कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह आढळला.
