Solapur Crime : नर्तकीमुळे स्वत:वर गोळी झाडली…गोविंद बर्गे प्रकरणात मोठा ट्विस्ट, गावकरी आणि नातेवाईकांचा मोठा दावा काय?
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुरुवातीला आत्महत्या म्हणून पाहिले जात असले तरी, त्यांच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. पूजा गायकवाड नावाच्या एका नर्तकीशी त्यांचे प्रेमसंबंध होते आणि तिने बर्गे यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

बीड जिल्हा गेल्या काळापासून गुन्ह्यांच्या घटनांमुळे गाजतोय. आता याच बीडच्या गेवराईतील लुखामसला गावच्या गोविंद बर्गे (Govind Barge Death) या माजी उप सरपंचाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने जिल्हा पुनहा हादरला आहे. पूजा गायकवाड या नर्तकीच्या प्रेमात असलेल्या गोविंद बर्गे यांनी सोमवारी रात्री कारमध्ये बसून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ माजली. मात्र आता याप्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. ते म्हणजे गोविंद बर्गे यांचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नसून याप्रकरणात घातपात झाला आहे, असा संशय बर्गे यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल आहे. तसेच या घटनेच सखोल तपास व्हावा अशी मागणीही लुखामसला गावच्या ग्रामस्थांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पूजा गायकवाड (वय 21) हिला अटक केली असून तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय ?
बार्शी तालुक्यातील सासुरे गाव परिसरात एका काळ्या रंगाची गाडी उभी असल्याची माहिती वैराग पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता त्या कारमध्ये एक इसम मृतावस्थेत आढळून आला. गोविंद जगन्नाथ बर्गे असे त्याचे नाव आणि तो गेवराई येथील लुखामसलाचा माजी उपसरपंच असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांना गाडीत एक पिस्तुलही सापडलं. याच पिस्तुनाले गोळी झाडल्याने बर्गे यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
पुढील तपास करत असताना सासुरे येथे राहणाऱ्या पूजाची धारिशवच्या कलाकेंद्रात गोविंद यांच्याशी भेट झाली. हळूहळू त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. ते विवाहीत असतानाही पूजाने त्यांच्याशी प्रेमसंबंध ठेवले आणि वर्षभरात तिने त्यांच्याकडून महागडा फोन, सोनं नाणं, जमीन, पैसे अशा अनेक गोष्टी घेतल्या. 5 एकर जमीन माझ्या भावाच्या नावावर करून द्या अशी मागणी पूजाने केली होती. त्यानतरं तिने हळूहळू गोविंद यांच्याशी बोलणं बंद केलं.
तिच्या या वागण्यामुळे दुखावलेल्या गोविंद यांनी तिला अनेक फोन केले, पण ती बोलायची नाही. पैशांसाठी आणि जमीनीसाठी ठाम होती. तिची समजूत काढायला सोमवारी गोविंदा तिच्या सासुरे गावी गेले. पण त्यांच्यातला वाद मिटला नाही, पूजाने बोलण्यास नकार दिल्याने गोविंद कारमध्ये परत येऊन बसले. त्यानंतर त्यांचा मृतदेहच सापडला. प्रेमप्रकरणातून त्यानी
माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एक तरुण गाडीमध्येच मृतावस्थेत आढळून आला.नंतर गोविंद जगन्नाथ बर्गे अशी मृत व्यक्तीची ओळख पटली आहे. गाडीत एक पिस्तूल देखील आढळले आहे. याच पिस्तुलीनेच डोक्यामध्ये गोळी घालून गोविंज बर्गे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, असा संशय पोलिसांना आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
आत्महत्या नव्हे घातपात
मात्र गोविंद बर्गे यांनी आत्महत्या केली नसून यामागे घातपात आहे असा संशय लुखामसला गावच्या नागरिकांनी व्यक्त केला आहे. ‘ आमच्या गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काल आत्महत्या केल्याचा फोन आम्हाला आला होता. आम्ही वैराग येथे आल्यावर त्यांचा मृतदेह गाडीत आढळला. मात्रा त्यावेळी गोविंद बर्गे हे ज्या अवस्थेत होते, त्यावरून ही आत्महत्या नव्हे तर यामागे काही घातपात आहे असा आमचा संशय आहे. वैराग येथील पूजा गायकवाड नामक एका नर्तीकेने त्यांना ब्लॅकमेल केलं होतं. ‘ असा आरोप मृत बर्गे यांचे नातेवाईक तसेच लुखापसला गावच्या सरपंचांनी केला आहे. तसेच आम्हाला पोलिसांनी संपूर्ण सहकार्य केले आहे मात्र या घटनेचा सखोल तपास व्हावा,अशी मागणीही त्यांनी केली.
