
बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. बीडमधील गेवराई येथील लुखामसालाचे माजी उपसरपंचाने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. सोलापुरातील बार्शी येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून गोविंद बर्गे असं मृत उपसरपंचाचं नाव आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गायकवाड नावाच्या एका नर्तकीवर त्यांचं जीवापाड प्रेम होतं, तिच्या प्रेमात ते अगदी वेडे झाले होते. मात्र आधी गोड बोलणारी पूजा काही दिवसांपासून त्यांच्याशी बोलत नव्हती, बर्गे यांचा फोनही उचलत नव्हती. यामुळेच बर्गे यांनी हे टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
पूजाला भेटण्यासाठी तिच्या गावी गेलेल्या गोविंद यांची काही तिच्याषशी भेट झाली नाही, ते समजूत काढण्यासाठी तिथे गेले होते, मात्र पूजा त्यांना भेटलीच नाही. अखेर बर्गे यांनी कारमध्ये बसत दार लॉक केलं आणि पिस्तुलाने स्वत:च्याच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. या भयानक प्रकरणामुळे सोलापूरही प्रचंड खळबळ माजली आहे. तर बर्गे हे ज्या गावचे माजी उपसरपंच होते, त्या गेवराईमध्ये तर शोककळाच पसरली आहे. बर्ग यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, भाऊ वगैरे असं कुटुंब असून त्यांना ही बातमी समजल्यापासून त्यांच्यावर तर दु:खाचा मोठा डोंगरच कोसळला आहे.
दरम्यान याप्रकरणी बर्गे यांच्या मेहुण्याने वैराग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. नर्तकी पूजा (वय 21) हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.
प्रेमाच्या जाळ्यात फसवून घेतेल पैसे, सोनं आणि..
गेल्या वर्षी 2024 मध्ये गोविंद बर्गे यांची धाराशिवमधील कलाकेंद्रात नर्तकी पूजाशी ओळख झाली. त्याचा फायदा घेत गोविंद हे विवाहीत असल्याचे, त्यांना 2 मुलं असल्याचे माहीत असूनही पूजाने त्यांच्याशी प्रेमसंबध ठेवले. तिच्या प्रेमात पडलेल्या गोविंद यांनी तिला वर्षभरात अनेकदा पैसे, जमी, सोनं-नाणं, तसेच महागडा मोबाईलही दिला. भावाच्या नावावर पाच एकर शेती करा अशी मागणी ती गोविंद यांच्याकडे करत होती, तसं केलं नाही तर बोलणार नाही, माझ्याशी दुष्कर्म केलं असा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही तिने गोविंद बर्गेंना दिली. तिने त्यांना बरंच लुबाडलं अशी माहिती समोर आली आहे.
तिची समजूत काढण्यासाठी रात्री आला…
तर गेल्या काही दिवसांपासून पूजा ही गोविंदशी नीट बोलत नव्हती. गोविंद तिच्याशी बोलण्यासाठी तिला फोन करायचे पण ती फोनच उचलायची नाही. यामुळे ते निराश झाले होते. दोघांत आलेल्या वितुष्टामुळे त्यांना काहीच सुचत नव्हतं.
अखेर तिच्याशी समोरासमोर बोलावं, तिची समजूत काढावी म्हणून घटनेच्या दिवशी गोविद हे पूजाच्या गावी सासुरे येथे पोहोचला. तिला भेटावं, समजवावं या हेतून तो तिथे गेला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ते तिथे पोहोचले. पण पूजाला भेटल्यानतंरही ती तिच्या मागण्यांवर ठाम होती, त्यांच्यात काहीच नीट बोलणं झाली नाही, परिस्थिती जराही सुधारली नाही.
अखेर गोविंद परत त्यांच्या कारमध्ये जाऊन ड्रायव्हिंग सीटवर बसले. कारचा दरवाजा त्यांनी आतून लॉक केला. जिच्यावर आपण जीव ओवाळून टाकला तिचं हे रुखरुखं वागणं, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तुटक बोलणं, त्यांना झेपलं नाही. आणि त्याच दु:खावेगात गोविंद बर्गे यांनी बंदूक घेऊन स्वत:च्या डोक्यात गोळी घालून घेतली आणि आयुष्य संपवलं. बर्गे यांच्या मृकुटंबाचा त्यूमुळे मोठी खळबळ माजली असून त्यांची दोन मुलं,कुटुंबाचा विचार करायला हवा होता अशी प्रतिक्रिया त्यांच्या भावाने दिली.