AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिदा झाली अन् सासऱ्याला घेऊन पळून गेली, आता नवरा म्हणतो, शोधणाऱ्यास मिळेल 20,000 रुपये

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने तिच्या सासऱ्यासोबत पळून जाण्याची घटना घडली आहे. तिने घरातील लाखो रुपयांचे दागिने आणि नगदीही सोबत नेली आहे. नवरा तिचा शोध घेत असून, पोलिसांनीही तपास सुरू केला आहे.

फिदा झाली अन् सासऱ्याला घेऊन पळून गेली, आता नवरा म्हणतो, शोधणाऱ्यास मिळेल 20,000 रुपये
Daughter in law Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 17, 2025 | 6:31 PM
Share

प्रेम कुणावरही होतं. लग्नाच्या आधी होतं किंवा लग्नाच्या नंतरही होतं. प्रेमासाठी वयाचं बंधन नाही. प्रेमासाठी जातीचं, धर्माचंही बंधन नसतं. अहो इतकंच काय आता प्रेमासाठी लोक नात्याचंही बंधन ठेवताना दिसत नाही. आता हेच बघा ना, उत्तर प्रदेशातील लग्न झालेली महिला. संसार सुखात चालला होता. तिचा जीव कुणावर जडवा? तर दुसऱ्या तिसऱ्या कुणावर नाही तर सासऱ्यावर. सासऱ्यावर जीव जडल्यानंतर ती चक्क सासऱ्यासोबत पळून गेली. आता नवरा म्हणतोय…

उत्तर प्रदेशातील सासू- जावई आणि व्याही आणि विहीण बाई पळून जाण्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून जोरात आहेत. आता इटावा येथे चुलत सासऱ्यासोबत चक्क सूनच पळून गेलीय. ही महिला तीन मुलांची आई आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. घरातील लाखो रुपये किमतीचे दागिने आणि दोन्ही मुलींना सोबत घेऊन ती गेली आहे. इटावा जिल्ह्यातील ऊसराहार पोलीस ठाण्यातील एका गावातील ही घटना आहे.

एक महिन्यापूर्वी पळाली

ही एक महिन्यापूर्वी पळाली आहे. तेव्हापासून तिचा नवरा तिचा शोध घेत आहे. पोलीस ठाण्याच्या अनेकदा खेटाही त्याने मारल्या. गावाकडे, नातेवाईकांकडे, ओळखीच्यांकडे… सर्वच ठिकाणी त्याने शोध घेतला. पण बायको काही सापडली नाही. त्यामुळे या महिलेचा नवरा अत्यंत निराश झाला आहे. त्याने बायकोचा पत्ता सांगणाऱ्याला किंवा बायको शोधून देणाऱ्याला 20 हजार रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पीडित व्यक्ती कार चालवून कुटुंबाचं पोट भरायचा. गेल्या महिन्यात 3 एप्रिल रोजी कार घेऊन तो कानपूरला गेला होता. तेव्हाच सर्व गडबड झाली.

मी घरी आलो तेव्हा…

या घटनेची माहिती स्वत: पीडीत व्यक्तीने दिली आहे. जेव्हा मी कानपूरवरून घरी आलो. त्यावेळी मला बायको आणि दोन मुली घरातून गायब असल्याचं दिसलं. नंतर मला कळलं माझ्या काकानेच माझ्या बायकोला पळवून नेलं आहे. मुलाला घरीच सोडलं होतं. बायको घरातून चार अंगठ्या, एक सोन्याचा हार, मंगळसूत्र आणि 50 हजार रुपये घेऊन पळून गेली आहे. मी पोलीस ठाण्यात 3 एप्रिल रोजीच गुन्हा दाखल केला आहे, असंही त्याने सांगितलं.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी बायको हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली आहे. पण माझ्या बायकोचा शोध घेण्यात आला नाही. मी 3 एप्रिलपासून बायकोचा शोध घेत आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तर, पीडीत व्यक्तीच्या बायकोच्या शोधासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. लवकरच महिला आणि तिच्या सासऱ्याबाबतची माहिती मिळेल, असं पोलिसांनी सांगितलं.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.