AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL | प्रसिद्ध मॉडेलने संपवलं जीवन, शेवटच्या कॉलमुळे IPL मधील प्रसिद्ध क्रिकेटपटू अडचणीत

IPL | . तिने इन्स्टा बायोमध्ये लिहिलय की, ती एक डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडल आहे. तपासात समोर आलय की, आयुष्य संपवण्याआधी तिने शेवटचा कॉल क्रिकेटपटूला केला होता. पोलीस वेगवेगळ्या अँगलने चौकशी करत आहेत.

IPL | प्रसिद्ध मॉडेलने संपवलं जीवन, शेवटच्या कॉलमुळे IPL मधील प्रसिद्ध क्रिकेटपटू अडचणीत
Tania Singh
| Updated on: Feb 21, 2024 | 1:21 PM
Share

सूरत : एका प्रसिद्ध मॉडलने जीवन संपवलं. त्यामुळे IPL मध्ये खेळणारा एक नावाजलेला क्रिकेटपटू अडचणीत आलाय. ही मॉडल सूरतची राहणारी आहे. तिच नाव तानिया सिंह आहे. तिने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. 28 वर्षाची तानिया फॅनश डिजायनिंग आणि मॉडलिंगच्या क्षेत्रात काम करायची. इन्स्टाग्रामवर तिचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिने इन्स्टा बायोमध्ये लिहिलय की, ती एक डिस्क जॉकी, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडल आहे. तपासात समोर आलय की, आयुष्य संपवण्याआधी तिने शेवटचा कॉल क्रिकेटपटूला केला होता. पोलीस वेगवेगळ्या अँगलने चौकशी करत आहेत.

इंड‍ियन प्रीम‍ियर लीग (IPL) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (SRH) कडून खेळणारा अभिषेक शर्मा अडचणीत सापडला आहे. सूरतच्या स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी त्याला समन पाठवलय. तानियाच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सूरतमध्ये आपला तपास सुरु केला. या दरम्यान IPL मधील SRH टीमचा खेळाडू अभिषेक शर्माच नाव समोर आलय. अभिषेक तानिया सिंहच्या संपर्कात असल्याच तपासात समोर आलय.

कधी जीवन संपवलं?

तानिया आणि अभिषेक मागच्या काही काळापासून संपर्कात नव्हते, हे सुद्धा तपासात दिसून आलय. पण चौकशीसाठी पोलिसांनी अभिषेकला सुद्धा बोलावलय. अभिषेक आणि तानियाच्या मैत्रीबद्दल पोलिसांना तपासातून माहिती मिळणार आहे. मॉडल तान‍िया रात्री उशिरा घरी परतली. त्यानंतर तिने जीवन संपवलं. तानियाच्या कुटुंबाला यामुळे मोठा धक्का बसलाय.

कॉल डिटेलमध्ये अनेक रहस्य

पोलीस सूत्रांनी सांगितलं की, तानियाच्या कॉल डिटेलमध्ये अनेक रहस्य आहेत. तिने शेवटचा कॉल सुद्धा अभिषेक शर्माला केला होता. जीवन संपवण्यामागे प्रेमसंबंध तर कारण नाही ना? या अँगलने पोलीस आता चौकशी करतायत.

SRH ने किती कोटीला विकत घेतलेलं?

अभिषेक शर्मा IPL मध्ये सनराइजर्स हैदराबाद टीमकडून खेळतो. तो ऑलराऊंडर आहे. त्याने आयपीएलच्या 47 सामन्यात 137.38 च्या स्ट्राइक रेटने 893 धावा केल्या. 75 त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. आयपीएलमधेये त्याने आतापर्यंत 4 अर्धशतक झळकावली आहेत. 9 विकेट काढल्यात. अभिषेकला 2022 आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 6.50 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...