नेत्यानं पत्नीचा ‘तो’ व्हिडीओ केला थेट फेसबुकवर पोस्ट; म्हणाला पाच जण…, अन् संपवलं आयुष्य
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलीस देखील हादरले आहेत.

उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका शेतकरी नेत्यानं आत्महत्या केली आहे. कुलदीप यादव असं या शेतकरी नेत्याचं नाव आहे, बायकोसोबत कडाक्याचं भांडण झालं. भांडणामुळे बायको देखील रागातच होती, जा मर असं यादव यांना त्यांची बायको म्हणाली, राग अनावर झाल्यानं कुलदीप यादव यांनी देखील रागाच्या भरात गळफास घेतला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषीत केलं.
ही घटना शनिवारी पालीमुकीमपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपूर चंदियाना या गावात घडली आहे. या गावामध्ये कुलदीप यादव आपल्या कुटुंबासोबत राहत होते. कोणत्या तरी गोष्टीवरून त्यांचा त्यांच्या पत्नीशी वाद झाला. दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणानंतर त्यांना त्यांची पत्नी जा मर असं म्हणाली.पत्नीच्या भांडणाला वैतागलेल्या कुलदीप यादव यांनी देखील आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुकवर पत्नीचा भांडतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला. एक सुसाइड नोट देखील लिहिली, विशेष म्हणजे यादव यांनी हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. पत्नीसह पाच लोकांकडून माझ्या जीवाला धोका असून, ते लोक मला मारून टाकतील असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांनी फेसबुकवर जो व्हिडीओ पोस्ट केला, त्यामध्ये पत्नी कोणाशी तरी फोनवर बोलत असताना दिसत आहे, त्यानंतर ती त्यांना म्हणताना दिसत आहे, की तुला कुठे जाऊन मरायचं ते मर. त्यानंतर कुलदीप यादव यांनी टोकाचं पाऊल उचललं, गळफास घेत आपलं जीवन संपवलं, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. भांडणामुळे त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे. या प्रकरणात आता कुलदीप यादव यांच्या पत्नीची चौकशी सुरू आहे.
