AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मीरला नको, मक्केला जा… हनिमूनवरून सासरा आणि जावयात भयंकर वाद; थेट ॲसिड हल्ला; कुणी केलं कांड?

शुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर एका इसमाने त्याच्या मुलीच्याच नवऱ्यावर, आपल्या जावयावर ॲसिड हल्ला केला. कल्याण पश्चिमेकडे घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जावई ईबाद फालके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काश्मीरला नको, मक्केला जा... हनिमूनवरून सासरा आणि जावयात भयंकर वाद; थेट ॲसिड हल्ला; कुणी केलं कांड?
लग्नात 7 नव्हे 4 फेरे, कोणत्या समुदायात ही प्रथा?; Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Dec 19, 2024 | 1:44 PM
Share

लग्नानंतर एकमेकांना समजून घेण्यासाठी, निवांत वेळ घालवण्यासाठी , फिरण्यासाठी बहुतांश जोडपी ही फिरायला, हनीमूनला जात असतात. दोघांच्या आवडीने कुठे जायचं हे ठरवतात. हनीमूनसाठी कुठे जायचं हा खरंतर पूर्णपणे त्या जोडप्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण काही वेळी घरचे त्यांच्या नात्यात नको तितकी दखल देतात आणि वादाला सुरूवात होते. समजूतदारपणे बोलणी केल्यास वाद मिटू शकतो अन्यथा उगाचच काडी पेटून भडका उडू शकतो. असंच काहीसं कल्याणमध्ये घडलं, शुल्लक कारणावरून सासरा आणि जावयामध्ये वाद झाला, मात्र तो एवढा गंभीर होता की सासऱ्याने आपल्याच मुलीच्या नवऱ्यावर थेट ॲसिड हल्ला केला ना राव !

कल्याण पश्चिमेकडे घडलेल्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला जावई ईबाद फालके याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हे आरोपी सासऱ्याचा कसून शोध घेत आहेत.

सासऱ्याने का केला हल्ला ?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील बाजारपेठ हद्दीतील आग्रा रोड आशा टॉवर्स परिसरात कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. हनिमूनला जाण्याच्या वादातून सासऱ्याने आपल्या जावयावर ॲसिड हल्ला केला. ईबाद फालके असे जखमी इसमाचे नाव असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईबाद याच्यावर जकी खोचाल यांनी ॲसिड हल्ला केला. हनीमूनला जाण्याच्या मुद्यावरून हा वाद पेटला.

रिपोर्ट्सनुसार, जकी यांच्या मुलीचा ईबादशी विवाह झाला. मात्र त्या दोघांनी हनीमूनला जाण्यापूर्वी मक्का-मदिनेला जावे अशी जकी यांची इच्छा होती, त्यांनी ती मागणीही केली. मात्र आम्ही काश्मीरला फिरायला जाणार असल्याचे ईबादने स्पष्ट केलं. त्यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या वादाने तीव्र स्वरूप घेतले आणि जकी खोटालने ईबाद फालकेवर ॲसिड फेकले. या हल्ल्यात ईबाद गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या घटनेनंतर आरोपी सासरा जकी याच्यावर गुन्हा दाखल झाला असून बाजारपेठ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून कौटुंबिक वादाचे भयावह परिणाम उघड झाले आहेत.

Follow Us
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?