
Minor Rape Case : बाप-लेकीचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक आहे. आपल्याला कोणतीही अडचण आली तर लेकीला सर्वात अगोदर तिचे वडीलच आठवतात. मुलगी धावत-पळत जाऊन आपल्या वडिलांना अडचणी सांगत असते. विशेष म्हणजे आपल्या लेकीच्या सुखासाठी जीवचं रान करणारे अनेक वडील तुमच्या आजूबाजूला पाहायला मिळतात. पण याच बाप-लेकीच्या नात्याला काळीमी फासणरे आणि अमानुष असे कृत्य करणाऱ्या नराधम बापाला सर्वात भयंकर शिक्षा मिळाली आहे. त्याने पोटच्या लेकीवर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे ही मुलगी अल्पवयीन होती. बापाच्या बलात्कारामुळे ती गर्भवती राहिली होती.
मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे हा प्रकार घडला आहे. येथे एका 15 वर्षीय मुलीवर बापानेच बलात्कार केला होता. या दृष्कृत्यात ती अल्पवयीन मुलगी नंतर गर्भवती राहिली होती. या प्रकरणातील क्रूर बापाला आता जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अनंतनाग येथील सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या प्रकरणातील पीडित मुलीने न्यायालयापुढे साक्ष दिली आणि ती ढसाढसा रडू लागली. त्यानंतर न्यायालयाने हा सर्वात अमानवी, नैतिक मुल्यांचे पतन, नीचपणा, मनोविकृतीचे प्रतिक असल्याचे सांगितले.
वेगवेगळ्या रिपोर्ट्सनुसार पीडित मुलीवर जेव्हा अत्याचार झाला तेव्हा ती अवघ्या 15 वर्षांची होती. तिच्या नराधम बापाने तिच्यावर 25 जानेवारी 2022 रोजी बलात्कार केला होता. यातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर अनंतनाग येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहितेच्या बलात्काराशी निगडित असलेल्या कलम 376 (3) आणि 506 (गुन्हेगारी स्वरुपाची धमकी) या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोबत बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्याअंतर्गतही कलम 6 अंतर्गत नराधम बापाविरोधात तक्रार करण्यात आली होती.
या प्रकरणा न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान पीडित मुलीने दिलेली लाक्ष सर्वात महत्त्वाची ठरली. उपलब्ध पुराव्यानुसार नंतर न्यायालयाने आरोपीला थेट जन्मठेपेची शिक्षा सुनावली.