AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यानंतर मुंबईत भयानक घटना, 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम थक्क करणारा

Mumbai Jogeshwari Rape Case: मुंबई खरंच सेफ आहे का? 12 वर्षीय मुलीसोबत 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान घडली अत्यंत धक्कादायक घटना, सामूहिक बलात्कारानंतर पोलिसांना दादर रेल्वे स्थानकात आढळली मुलगी, घटनाक्रम थक्क करणारा....

पुण्यानंतर मुंबईत भयानक घटना, 12 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम थक्क करणारा
फोटो सौजन्य - फाईल फोटो
| Updated on: Mar 07, 2025 | 9:42 AM
Share

Mumbai Jogeshwari Rape Case: विद्येचं माहेरघर पुण्यानंतर मुंबईत अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 12 वर्षीय मुलीवर पाच जणांनी बलात्कार केलाय. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. 24 फेब्रुवारी रोजी घरातून गायब झालेली मुलगी 27 फेब्रुवारी रोजी पालिसांना भेटली. पण तोपर्यंत फार उशिर झाला होता. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर अत्याचार करण्यात आले. दादर रेल्वे स्थानक परिसरात आढलेल्या मुलीने पोलिसांना 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यानचा घटनाक्रम सांगितला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मुंबईतील जोगेश्वरी येथे तिच्या नातेवाईकांसोबत राहत होती. 24 फेब्रुवारी रोजी मुलगी घरातून गायब झाली. पीडित मुलीच्या काकांनी 26 फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र मुलगी सापडली नाही.

याच दरम्यान, मुलगी 27 फेब्रुवारी रोजी दादर रेल्वे स्थानकात एकटीच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांना संशाय आला आणि त्यांनी मुलीची चौकशी केली. तेव्हा त्या 12 वर्षांच्या मुलीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दादर पोलिसांनी मुलीला जोगेश्वरी पोलिसांच्या ताब्यात दिलं.

तपासात मिळालेल्या माहितीनुसार, एका एसी मॅकेनिकने मुलीचं अपहण केलं. मुलीला एकटी पाहून आरोपींनी तिला जोगेश्वरीतील संजय नगर भागात असलेल्या त्याच्या घरी नेले. जिथे 26 फेब्रुवारीच्या रात्री तीन तरुणांनी तिच्यावर आळीपाळी बलात्कार केला. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी मुलीने तिघांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली.

जोगेश्वरी येथून स्वतःची सुटका केल्यानंतर पीडित मुलगी घाटकोपरपर्यंत पोहोचली. त्यानंतर अन्य दोन पुरुषांनी तिली मदद करतो असं सांगत मरीन ड्राईव्ह आणि त्यानंतर दादर येथे घेऊन गेले. दोघांनी देखील मुलीवर अत्याचार केले. 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान मुलीसोबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पाचही आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात भांडण झाल्यामुळे मुलगी घर सोडून गेली होती. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 12 वर्षीय मुलीवर झालेल्या  घटनेनंतर महिलांसाठी सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरातही महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण