विलेपार्ले पश्चिमेच्या एलआयसी ऑफिसला आग, महत्वाचे दस्ताऐवज जळाल्याची भीती

ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांच्या LIC ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावरील कॉमन पॅसेजवर धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे.

विलेपार्ले पश्चिमेच्या एलआयसी ऑफिसला आग, महत्वाचे दस्ताऐवज जळाल्याची भीती
विलेपार्ले पश्चिमेच्या एलआयसी ऑफिसला आगImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 11:55 AM

मुंबई – विलेपार्ले (Vileparle) पश्चिमेच्या एलआयसी (LIC) ऑफिसला सकाळी सात वाजता अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलिस आणि अग्नीशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लागलेल्या आग लेवल २ ची आहे. सध्या तिथे फायर ब्रिगेडच्या आठ गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करीत आहेत. तसेच घटनास्थळी पोलिसांनी (Police) कडक बंदोवस्त ठेवला आहे. काही महत्त्वाचे दस्ताऐवज जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दुसऱ्या मजल्यावर धुरांचे लोट

ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांच्या LIC ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. दुसऱ्या मजल्यावरील कॉमन पॅसेजवर धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे. सकाळी अचानक आग लागल्याने परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अग्नीशामक दलाच्या आठ गाड्या आग विझवण्याचं काम करीत आहेत.

अनेक वस्तूंना आग लागली आहे

ग्राउंड आणि वरच्या दोन मजल्यांच्या LIC ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पगार बचत योजना विभाग आहे. तिथल्या इलेक्ट्रिक वायरिंग, इन्स्टॉलेशन, कॉम्प्युटर, फाइल रेकॉर्ड, लाकडी फर्निचर इत्यादी वस्तूंना आग लागली आहे. विलेपार्ले पश्चिम येथे नानावटी हॉस्पिटल समोर, स्वामी विवेकानंद मार्गावर एलआयसीचं कार्यालय आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.