AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटना; स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, एक जखमी

या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यापैकी 5 जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले.

उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटना; स्लॅब कोसळून चौघांचा मृत्यू, एक जखमी
उल्हासनगरात पुन्हा एकदा इमारत दुर्घटनाImage Credit source: TV9
| Updated on: Sep 22, 2022 | 4:38 PM
Share

उल्हासनगर / निनाद करमरकर (प्रतिनिधी) : उल्हासनगरमध्ये आज पुन्हा एकदा एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची (Slab Collapse) दुर्घटना घडली आहे. कॅम्प 5 मध्ये घडलेल्या या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू (Death) झाला तर एक जण जखमी (Injury) झाला आहे. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं आहे.

इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळला

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील ओटी सेक्शन भागात मानस टॉवर नावाची पाच मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आज दुपारच्या सुमारास कोसळला आणि थेट तळमजल्यावर असलेल्या चक्कीवर येऊन कोसळला.

चौघांचा मृत्यू, एक जखमी

या दुर्घटनेत इमारतीमधील काहीजण जण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यापैकी 5 जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून एका जखमीवर उपचार सुरू असल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

महापालिकेकडून रिकामी करण्यात आली होती इमारत

सागर ओचानी, रेणू धनवानी, धोलानदास धनावनी, प्रिया धनवानी अशी या चार मृतांची नावं आहेत. मानस टॉवर ही इमारत उल्हासनगर महापालिकेकडून धोकादायक घोषित करून संपूर्णपणे रिकामी करण्यात आली होती.

काहीजण लपून छपून करत होते वास्तव्य

मात्र तरीही या इमारतीत काहीजण लपून-छपून वास्तव्य करत होते. त्यामुळे आज दुपारी ही दुर्घटना घडल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकून चार जणांचा मृत्यू झाला.

ढिगाऱ्याखाली आणखी काही जण दबल्याची शक्यता

या घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. इमारतीत नेमके किती जण होते, हे निश्चित नसल्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता व्यक्त होतेय.

यामुळे उल्हासनगर महापालिकेने एनडीआरएफच्या टीमला सुद्धा पाचरण केल्याची माहिती उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी दिली आहे.

काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?
जेजुरीत भंडाऱ्यानं आगीचा भडका उडाला, प्रत्यक्षदर्शीनं सांगितल घडल काय?.